air travel list of prohibited items in flight during airport security check
विमान प्रवासादरम्यान 'या' गोष्टींवर बंदी; चुकूनही सोबत घेऊ नका, अन्यथा... By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 6:56 PM1 / 7देशात हजारो लोक विमानाने प्रवास करतात आणि आता ही संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, विमानाने प्रवास करणे रेल्वे किंवा बसपेक्षा थोडे वेगळे असते, म्हणजेच या प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या कारणांवर विशेष लक्ष दिले जाते. एका छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला विमानात जाण्यापासून रोखले जाते.2 / 7नियमितपणे विमानाने प्रवास करणार्या बहुतेक लोकांना विमानात कोणत्या वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे, याची माहिती असते. मात्र, काही लोकांना याबद्दल माहिती नसते किंवा जे पहिल्यांदा विमानाने प्रवास करतात त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.3 / 7विमानात चढण्यापूर्वी तुमचे सामान विमानतळावर तपासले जाते. यादरम्यान तुमच्या सामानासोबत कोणतीही प्रतिबंधित वस्तू आढळल्यास ती जप्त केली जाते. अनेक वेळा प्रकरण गंभीर असल्यास प्रवाशाला प्रवास करू दिला जात नाही.4 / 7पॉवर बँक, ड्राय सेल बॅटरी, चाकू, कात्री, इतर तीक्ष्ण साधने, दारुगोळा किंवा खेळण्यांच्या बंदुका, बंद करता येणार नाहीत अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, एरोसोल आणि द्रवपदार्थ, कायद्याने सुरक्षिततेसाठी धोका मानल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही वस्तू विमान प्रवासादरम्यान सोबत घेता येणार नाही.5 / 7पॉवर बँकमध्ये लिथियम लोहाच्या बॅटरी असतात, ज्याला इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन घातक मानते. कारण, या बॅटरीज व्यवस्थित ठेवल्या नाहीत तर त्यांचा स्फोट होण्याचा धोका असतो. 6 / 7विमान कंपन्यांचे सामान आणि केबिन बॅगेज बाबत वेगवेगळे नियम आहेत, परंतु दोन्हींना ज्वलनशील पदार्थांसह इतर प्रतिबंधित साहित्य वाहून नेण्यास सक्त मनाई आहे.7 / 7नागरी विमान वाहतूक ब्युरोच्या म्हणण्यानुसार, विमानतळ तपासणी दरम्यान दररोज 25,000 प्रतिबंधित वस्तू प्रवाशांकडून जप्त केल्या जातात. जर तुम्ही या प्रतिबंधित वस्तूंसह प्रवास करत असाल तर तुम्हाला चेक इन आणि चेक आउट करण्यासाठी खूप वेळ लागतो. आणखी वाचा Subscribe to Notifications