शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Jio च्या ‘या’ प्लानसमोर Airtel चितपट! किंमतही स्वस्त आणि फिचर्सही जास्त; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 2:28 PM

1 / 9
ग्राहकांना चांगले प्लान देण्यासाठी देशातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये चढाओढ लागलेली दिसते. यातच वर्क फ्रॉम होममुळे आणि कोरोना संकट काळात इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे.
2 / 9
या पार्श्वभूमीवर मोबाइल कंपन्यांनीही कमी किमतीत जास्त इंटरनेट सुविधा असलेले प्लान आणले आहेत. दररोज १.५ जीबी डेटा मिळण्यामध्ये जिओने एअरटेलला मात दिली आहे.
3 / 9
Jio च्या ११९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ GB डेटा मिळेल. या प्लानची वैधता १४ दिवस असून यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देखील उपलब्ध असेल. यामध्ये एकूण ३०० एसएमएस तुम्हाला मिळतील.
4 / 9
Jio चा १.५ जीबी डेटा प्रतिदिन असलेल्या दुसऱ्या प्लानची किंमत १९९ रुपये आहे. या प्लानची वैधता २३ दिवसांची आहे. यामध्ये दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत. तुम्हाला अधिक वैधता हवी असेल तर तुम्ही २३९ रुपयांचा रिचार्ज करू शकता. या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता उपलब्ध असेल.
5 / 9
Jio चे ४७९ आणि ६६६ रुपयांचे प्लान देखील आहे. ज्यात दररोज १.५ GB डेटा मिळतो. या प्लान्सची वैधता अनुक्रमे ५६ दिवस आणि ८४ दिवस आहे. जिओचा २, ५४५ रुपयांचा प्लान देखील आहे. ज्यामध्ये ३३६ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग आणि १.५ जीबी डेटा दररोज उपलब्ध असेल.
6 / 9
Airtel दैनंदिन १.५ GB डेटा प्लानची सुरुवातीची किंमत २९९ रुपये आहे. त्याची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस देखील उपलब्ध असतील. दुसरा प्लान ४७९ रुपयांचा आहे.
7 / 9
Airtel या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस प्रतिदिन १.५ GB डेटा प्रतिदिन उपलब्ध आहे. याची वैधता ५६ दिवसांची आहे. Airtel चा ७१९ रुपयांचा प्लान ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये १.५ GB डेटा आणि १०० मेसेजेस प्रतिदिन अनलिमिटेड कॉलिंगसह उपलब्ध आहेत.
8 / 9
Airtel चा सुद्धा ६६६ रुपयांचा प्लान आहे आणि यामध्ये वरील सर्व सुविधा उपलब्ध आहेत. एअरटेलच्या या सर्व प्लानसह, Amazon Prime Video ची मोबाइल आवृत्ती ३० दिवसांसाठी मोफत उपलब्ध आहे.
9 / 9
एकूणच, किंमतीच्या बाबतीत, Jio चा १.५ GB डेली डेटा प्लान Airtel पेक्षा स्वस्त आहे.
टॅग्स :JioजिओAirtelएअरटेल