Airtel CEO Gopal Vittal warns users about cyber fraud cases becoming alarmingly frequent
३५ कोटींपेक्षा अधिक Airtel युझर्ससाठी महत्त्वाची बातमी; कंपनीनं दिली ही 'वॉर्निंग' By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 12:18 PM1 / 12सायबर फसवणुकीच्या (Cyber Fraud) घटना झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत युझर्सच्या फोनमध्ये असलेली बँकेची माहिती चोरी होण्याची धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. 2 / 12अनेक हॅकर्स आपल्या चतुराईनं युझर्सना आपल्या जाळ्यात अडकवत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. हा धोका लक्षात घेता, एअरटेलचे सीईओ गोपाल विट्टल (Airtel CEO Gopal Vittal) यांनी कंपनीच्या ३५० दशलक्षहून अधिक युझर्सना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देणारा ईमेल पाठवला आहे.3 / 12विट्टल यांनी अलीकडील फसवणुकीचा संदर्भ दिला. ज्यामध्ये एक फसवणूक करणारा एअरटेल एक्झिक्युटिव्ह म्हणून केवायसी अपडेटच्या बहाण्याने वापरकर्त्यांकडून त्यांचे बँक तपशील मिळवायचा. 4 / 12या ईमेलमध्ये त्यांनी अशा आर्थिक फसवणूक आणि फसवणूक करणाऱ्यांबद्दल आणि ते कशाप्रकारे अशी कामं करतात याबद्दल सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टीही ईमेलमध्ये सांगितल्या आहेत. 5 / 12सध्या मोठ्या प्रमाणात UPI अॅप्सचा वापर केला जात आहे. त्यामुळे आजकाल मोठ्या प्रमाणात बनावट UPI अॅप्स तयार करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. 6 / 12सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात बनावट युपीआय अॅप्स उपलब्ध आहेत आणि ते NPCI आणि BHIM अॅपप्रमाणे हुबेहुब वाटतात . जेव्हा तुम्ही ही अॅप डाऊनलोड करता तेव्हा ते तुम्हाला MPIN शिवाय तुमच्या बॅकेची सर्व माहिती टाकायला सांगतात, असं विट्टल यांनी नमूद केलं आहे. 7 / 12या माहितीच्या आधारे हॅकर युझर्सच्या बँक अकाऊंटमधून पैसे चोरतात. अशा प्रकारचे लोकं स्वत:ला बँक एक्झिक्युटिव्ह असल्याचं सांगत बँक अकाऊंट ब्लॉक अनब्लॉक किंवा रिन्यू करण्याचं सांगत ओटीपी मागतात. अशा प्रकारच्या कॉल्सपासून सावध राहण्याची गरज असल्याचं विट्टल यांनी सांगितलं.8 / 12हॅकर्स अनेकदा युझर्सना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आकर्षक ईमेल पाठवत असतात. त्यामध्ये एक फेक लिंक असते, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची बँक डिटेल चोरी होऊ शकते, असंही विट्टल यांनी आपल्या ईमेलमध्ये नमूद केलंय.9 / 12याचप्रकारे विट्टल यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, विजा किंवा मास्टरकार्डकडून येणारे फेक रिफंड्स, पॉईंट्स किंवा रिवॉर्ड्सचे ईमेलदेखील धोकादायक असू शकतात असं म्हटलं आहे. यामध्ये देण्यात आलेल्या अॅटॅचमेंट्सवर क्लिक न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. 10 / 12आपल्या फोनमध्ये ग्राहकांना अँटीव्हायरसचा वापर केला पाहिजे. जेणेकरून तुमच्याद्वारे डाऊनलोड केल्या जाणाऱ्या सर्व फाईल्स तो स्कॅन करेल. तसंच अनेक धोक्यांपासून तो काही प्रमाणात वाचवू शकेल, असंही त्यांनी म्हटलंय.11 / 12सायबर कॅफेमध्ये असलेल्या कॅम्प्युटर्सच्या माध्यमातून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्स करू नये, याशिवाय पब्लिक वायफाय नेटवर्कवर ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करण्यापासून वाचलं पाहिजे, असंही त्यांनी आपल्या ईमेलमध्ये नमूद केलं आहे.12 / 12कोणत्याही प्रकारच्या फसवणूकीपासून वाचण्याची योग्य पद्धत म्हणजे कोणत्याही फोनवर आपला कस्टमर आयडी, MPIN, OTP देण्यात येऊ नये. याशिवाय तुमच्याकडे कोणताही फेक मेसेज आला असेल तर त्यावर देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. असे मेजे त्वरित तुमच्या मोबाईलमधून डिलीट करून टाका. आणखी वाचा Subscribe to Notifications