शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एअरटेलचा स्वस्तात प्लॅन! १५० रुपयांपेक्षा कमी किमतीत २० पेक्षा OTT प्लॅटफॉर्म मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 3:11 PM

1 / 7
जुलैच्या सुरुवातीलाच टेलिकॉम कंपन्यांनी आपले प्लॅन महाग केले आहेत. अनेक जुने मोफत OTT प्लॅन आता काढून टाकण्यात आल्या आहेत आणि वापरकर्त्यांसाठी मोफत OTT प्लॅन निवडणे आता सोपे राहिलेले नाही.
2 / 7
एअरटेल ही एकमेव कंपनी आहे जी १५० रुपयांपेक्षा कमी किमतीत २० पेक्षा जास्त ओटीटीचा अॅक्सेस देत आहे.
3 / 7
एअरटेलकडून अनेक स्किम्स ऑफर केल्या जात आहेत, जे अतिरिक्त डेटासह विनामूल्य OTT देतात. यातील एक प्लान १४९ रुपये किंमतीचा आहे. हा फक्त डेटा- प्लॅन आहे आणि कोणत्याही विद्यमान सक्रिय योजनेसह रिचार्ज केला जाऊ शकतो.
4 / 7
भारती एअरटेलने ऑफर केलेल्या १४९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 1GB अतिरिक्त डेटा मिळतो. या स्किम्सची वैधता सध्याच्या सुरू असलेल्या प्लॅनसारखीच आहे.
5 / 7
तुमचा सक्रिय प्लॅन पुढील ३० दिवसांसाठी वैध असल्यास आणि त्यावर रिचार्ज केल्यावर, अतिरिक्त डेटा देखील तेवढ्याच दिवसांसाठी उपलब्ध असेल.
6 / 7
हा प्लॅन ३० दिवसांसाठी Airtel Xstream Play च्या ऍक्सेससह येतो. ही सेवा २० हून अधिक OTT सेवांमधून व्हिडीओ पाहण्याचा पर्याय देत आहे, याच्या यादीमध्ये Sony LIV, Lionsgate Play, Fancode, Eros Now, hoichoi आणि ManoramaMAX इत्यादींचा समावेश आहे.
7 / 7
मोबाईल डिव्हाइसेसशिवाय हा कंटेंट स्मार्ट टिव्हीवरही पाहता येईल. आणि तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता असल्यास, १८१ रुपयांच्या प्लॅनसह रिचार्ज करण्याचा पर्याय आहे, जे 15GB अतिरिक्त डेटासह समान फायदे देते.
टॅग्स :Airtelएअरटेलbusinessव्यवसाय