शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता केवळ ८९ रुपयांमध्ये पाहता येणार Amazon Prime, 'या' कंपनीनं आणला नवा प्लॅन

By जयदीप दाभोळकर | Published: January 13, 2021 3:19 PM

1 / 10
सध्या ग्राहकांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचं क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. हेच अगदी आता दूरसंचार कंपन्यांनीही हेरलं आहे. एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष प्लॅन लाँच केला आहे.
2 / 10
कंपनीचा हा प्लॅन ८९ रूपयांपासून सुरू होतो. एअरटेलनं यासाठी अॅमेझॉनसोबत करार केला आहे. हा केवळ मोबाईलच्या ग्राहकांसाठीच देण्यात आलेला प्लॅन आहे.
3 / 10
एअरटेलचा हा प्लॅन सिंगल युझर मोबाईल ओनली प्लॅन आहे. या अंतर्गत एअरटेल युझरला एसडी क्लालिटीमध्ये Amazon Prime व्हिडीओ सर्व्हिसेसचा लाभ घेता येणार आहे.
4 / 10
भारतात प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशन प्लॅन लाँच अंतर्गत बंडल्ड प्रिपेड प्लॅन्सवर एअरटेलच्या सर्व ग्राहकांना ३० दिवसांसाठी मोफत सेवा दिली जात आहे.
5 / 10
ग्राहकांना Airtel Thanks app द्वारे आपलं अॅमेझॉन साईन अप करावं लागेल.
6 / 10
सध्या केवळ भारतातच Prime Video: Mobile Edition प्लॅन उपलब्ध आहे. ही ऑफर आजपासूनच लागू होणार आहे.
7 / 10
३० दिवसांच्या मोफत सेवेनंतर जर एअरटेलच्या ग्राहकांना हा प्लॅन सुरू ठेवायचा असेल तर ग्राहकाला ८९ रूपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे.
8 / 10
या मोबाईल एडिशन प्लॅनसोबत ग्राहकांना ६ जीबी डेटाही दिला जाणार आहे. तसंच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची सेवा २८ दिवसांकरिता वापरता येणार आहे.
9 / 10
याव्यतिरिक्त कंपनी २९९ रूपयांचाही एक प्लॅन देत आहे. या अंतर्गत ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि अॅमेझॉन प्राईम व्हिडीओचा अॅक्सेसही मिळणार आहे. या प्लॅनदेखील २८ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो.
10 / 10
यासह असलेली एक प्रमुख अट म्हणजे ग्राहकांना केवळ प्राईम व्हिडीओवरीलच कंटेंटचा लाभ घेता येणार आहे. त्या अॅमेझॉनच्या प्राईम मेंबर्सना मिळणारा लाभ मिळणार नाही.
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनAirtelएअरटेलMobileमोबाइल