शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel च्या ग्राहकांसाठी मोठी भेट; अशाप्रकारे मिळेल ६ जीबीपर्यंत डेटा; पाहा प्रोसेस

By जयदीप दाभोळकर | Published: February 13, 2021 8:04 PM

1 / 10
भारती एअरटेलनं आपल्या ग्राहकांसाठी विशेष भेट दिली आहे. कंपनी आपल्या प्रीपेड सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना ६ जीबीपर्यंतचा डेटा मोफत देत आहे.
2 / 10
सध्या कंपनी आपल्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या व्हॅलिडिटीचे अनेक कॉम्बो पॅक्स ऑफर करत आहे.
3 / 10
टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार २८ दिवसांची वैधता असलेल्या कॉम्बो पॅकवर २ जीबी डेटा आणि ५६ दिवसांची वैधता असलेल्या पॅकवर ४ जीबी आणि ८४ दिवसांच्या पॅकवर कंपनीकडून ६ जीबी डेटा मोफत देण्यात येत आहे.
4 / 10
जर तुम्ही रिचार्ज करणार असाल तर २८ दिवसांच्या वैधतेसह असे एकूण आठ प्लॅन्स आहेत. ज्यावर २ जीबी मोफत डेटा मिळेल.
5 / 10
यामध्ये २१९ रूपये, २४९ रूपये, २७९ रूपये, २९८ रूपये, ३४९ रूपये, ३९८ रूपये आणि ४४८ रूपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. यासोबत १ जीबी डेटाची दोन कुपन्स देण्यात येतील.
6 / 10
याचप्रकारे ५६ दिवसांची व्हॅलिडिटी असणारे ३९९ रूपये, ४४९ रूपये, ५५८ रूपये आणि ५९९ रूपयांच्या प्लॅन्सचा समावेश आहे. यामध्ये १ जीबीची ४ कुपन्स देण्यात येतात.
7 / 10
तर दुसरीकडे तुम्हाला डेटासोबत अधिक वैधता हवी असेल तर ५९८ रूपये आणि ६९८ रूपयांच्या रिजार्जसह ६ जीबी अतिरिक्त डेटा मिळवू शकता. यामध्ये १ जीबी डेटाची ६ कुपन्स देण्यात येतात.
8 / 10
रिपोर्टनुसार मोफत डेटासाठी वर दिलेल्या प्लॅन्सपैकी कोणताही एक प्लॅन सिलेक्ट करावा लागेल. परंतु यासाठी एकच अट आहे.
9 / 10
ग्राहकांना केवळ एअरटेल थँक्स अॅपमधूनच रिचार्ज करावं लागेल. कंपनीचं हे ऑफिशिअल अॅप असून ते गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपलच्या अॅप स्टोअरवरून डाऊनलोड करता येऊ शकतं.
10 / 10
यावरू रिचार्ज केल्यानंतर युझर्सना मोफत डेटाची कुपन दिली जातात. ही कुपन्स My Coupons मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. कुपनची वैधताही त्याच ठिकाणी पाहता येईल. तसंच या ठिकाणाहूच युझर्सना कुपन्स रिडिम करण्याचाही पर्याय मिळेल.
टॅग्स :Airtelएअरटेलbusinessव्यवसायSmartphoneस्मार्टफोनInternetइंटरनेट