airtel payments bank launches gold investment platform digigold in partnership with safegold
Airtel देणार १ रूपयांत सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी; सुरु केला नवा प्लॅटफॉर्म By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 1:40 PM1 / 13कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारापेक्षा सध्या अनेक जणांचा कल हा सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याकडे आहे. 2 / 13दरम्यान, एअरटेल पेमेंट्स बँकेनं (Airtel Payments Bank) गुरूवारी सेफगोल्ड (Safegold) सोबत करार करून गोल्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म डिजिगोल्ड लाँच केला. 3 / 13सेल्फगोल्ड हा एक डिजिटल गोल्ड प्रोवायडर आहे.4 / 13डिजिगोल्ड प्लॅटफॉर्मचा वापर करून एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बचत खात्याच्या ग्राहकांना २४ कॅरेट सोन्यात गुंतवणूक करता येणार आहे. 5 / 13याशिवाय त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्रांनाही डिजिगोल्ड गिफ्ट करण्यात सक्षम असतील. फक्त यासाठी त्यांच्याकडे एअरटेल पेमेंट्स बँकेसोबत बचत खातं असणं आवश्यक आहे. 6 / 13पेमेंट्स बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ग्राहकांनी खरेदी केलेले सोने सेफगोल्डद्वारे सुरक्षितपणे सिक्युर केलं जाईल आणि एअरटेल थँक्स अॅपच्या माध्यमातून ग्राहक कधीही ते सहजपणे विकू शकतात.7 / 13यासाठी कोणत्याही गुंतवणूकीचे किमान मूल्य आवश्यक नाही आणि ग्राहक किमान एका रुपयाने सुरुवात करू शकतात असेही कंपनीनं नमूद केलं. 8 / 13डिजिगोल्ड आमच्यासाठी एक नव्या बँकिंग प्रस्तावाचा एक सोपा आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे, असं मत एअरटेल पेमेंट्स बँकेचे सीओओ गणेश अनंतनारायण यांनी व्यक्त केलं.9 / 13आमचे ग्राहक अत्यंत सोप्या पद्धीनं डिजिटल रूपात सोन्यात गुंतवणूक करू शकतात. आम्ही ग्राहकांना नियमित रुपानं गुंतवणूक करण्यास सक्षम बनवण्यासाठी सातत्यानं योजना सुरू करण्यावर विचार करत आहोत, असंही ते म्हणाले. 10 / 13गुंतवणूकीचं आवडतं साधन म्हणून पुन्हा एकदा सर्व सोन्याकडे वळले आहेत, असी प्रतिक्रिया सेफ गोल्डचे व्यवस्थापकीय संचालक गौरव माथुर यांनी दिली.11 / 13आम्ही ग्राहकांची आवड आणि त्यांच्या आवडीची पद्धत आणि मूल्य डिजिटल गोल्ड संबंधित प्रोडक्टची सीरिज सादर करण्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँकेसोबत करार केला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 12 / 13एअरटेल पेमेंट्स बँकेनं नुकतंच रिझर्व्ह बँकेनुसार आपल्या सेव्हिंग डिपॉझिट लिमिटला वाढवून २ लाख रूपये केलं आहे.13 / 13बँक आता १-२ लाख रूपये जमा रकमेवर ६ टक्के दरानं व्याज देत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications