शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel च्या 'या' ग्राहकांना मिळणार मोफत रिचार्ज; कोट्यवधी ग्राहकांना होणार फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 9:09 AM

1 / 15
सध्या देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा एकदा अनेक राज्यांनी निर्बंध घातले आहेत. अशा परिस्थितीत एअरटेलनं ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
2 / 15
कोरोनामुळे घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर प्रीपेड ग्राहकांना दिलासा देण्यासाठी एअरटेलनं ४९ रूपयांचं रिचार्ज मोफत देणार असल्याचं म्हटलं आहे. ही वन टाईम ऑफर असेल.
3 / 15
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे ५.५ कोटी ग्राहक हे कमी उत्पन्न गटातील आहे. ज्यांना कोरोनामुळे कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.
4 / 15
हा प्लॅन त्यांना वेळीच फायदा देऊ शकेल असं कंपनीनं म्हटलं आहे. याशिवाय कंपनीनं ७९ रूपयांच्या प्लॅनमध्ये दुप्पट बेनिफिट्स देण्याचीही घोषणा केली आहे.
5 / 15
एकूण मिळून सर्व ग्राहकांना २७० कोटी रूपयांचे बेनिफिट्स मिळू शकतात, असं कंपनीनं नमूद केलं आहे.
6 / 15
एअरटेल ही सेवा आठवड्याच्या सुरूवातीपासून सुरू करणार आहे. कंपनी काही स्मार्ट प्लॅन्स सादर करून शकते.
7 / 15
यामध्ये ४५ रूपये, ४९ रूपये आणि ७९ रूपयांचेही रिचार्ज प्लॅन्स सामिल आहे. यात काही बेसिक सुविधा मिळतील.
8 / 15
एअरटेलनं दिलेल्या माहितीनुसार कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना पैसे न देता ४९ रूपयांचं रिचार्ज करता येईल.
9 / 15
ग्राहकांना या ऑफरचा लाभ एकदाच मिळेल. यामध्ये ३८.५२ रूपयांचा टॉकॉटाईम आणि १०० एमबी डेटा मिळणार असून याची वैधता २८ दिवसांची आहे.
10 / 15
७९ रूपयांच्या प्लॅनमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना दुप्पट बेनिफिट्स देणार आहे. यामध्ये यापूर्वी १२८ रूपयांचा टॉकटाईम आणि २०० एमबी डेटा देण्यात येत होता.
11 / 15
यामागील आमचा उद्देश महासाथीदरम्यान ग्रामीण भाहाकील लोकांना माहिती आणि तंत्रज्ञानासोबत जोडून ठेवणं हा आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.
12 / 15
या ऑफरद्वारे आमचा उद्देश साडेपाच कोटी ग्राहकांना एकमेकांशी जोडून ठेवणं हा असल्याचंही कंपनीनं म्हटलं.
13 / 15
आमचा मुख्य फोकस ग्रामीण भागातील ग्राहकांवर आहे. या महासाथीदरम्यान त्यांना जोडून ठेवणं आणि गरज पडल्यास त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचावी यासाठी हे आवश्यक असल्याचंही एअरटेलनं म्हटलं.
14 / 15
यापूर्वी रिलायन्स जिओनंदेखील आपल्या ग्राहकांना कोरोना महासाथीदरम्यान दिलासा देण्याचा निर्णय घेतला होता.
15 / 15
Reliance Jio नं आपल्या ग्राहकांना ३०० मिनिट्स मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दरररोज १० मिनिटं याप्रमाणे महिन्याला ३०० मिनिटांचा वापर ग्राहकांना रिचार्जशिवाय करता येईल. याशिवाय कंपनी एकावर एक रिचार्ज मोफत अशीही ऑफर ग्राहकांना देत आहे.
टॅग्स :AirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाSmartphoneस्मार्टफोनInternetइंटरनेटcorona virusकोरोना वायरस बातम्या