शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Airtel चे डेटा पॅक्स, ५० जीबीपर्यंत डेटा आणि OTT सबस्क्रिप्शन, किंमत ४८ रूपयांपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2021 2:52 PM

1 / 10
रिलायन्स जिओच्या एन्ट्रीनंतर देशातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. Airtel नं नुकतेच काही नवे प्लॅन सादर केले आहेत. यामध्ये OTT सबस्क्रिप्शनही देण्यात येत आहे.
2 / 10
एअरटेलच्या या एकूण डेटा पॅक्सची संख्या आता ८ झाली आहे. याची किंमत ४८ रूपयांपासून सुरू होऊन ४०१ रूपयांपर्यंत जाते. दरम्यान, तुमचा डेटा संपतो त्यावेळी हे डेटा पॅक्स अधिक कामी येतात. अशातच यासोबत ओटीटी प्लॅटफॉर्म्सचं सबस्क्रिप्शन मिळत असेल तर हा डबल धमाकाच म्हणावा लागेल.
3 / 10
४८ रूपयांचा पॅक हा कंपनीचा सर्वात स्वस्त पॅक आहे. यामध्ये ग्राहकांना ३ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच याची वैधता ही सध्याच्या पॅकच्या वैधतेवर अवलंबून असते. जर पॅक अॅक्टिव्ह नसेल तर या पॅकसोबत २८ दिवसांची वैधता मिळते. काही युझर्सना या पॅकसोबत ३ जीबी अतिरिक्त म्हणजेच ६ जीबी डेटाही मिळतो.
4 / 10
एअरटेलचा दुसरा ७८ रुपयांचा एक पॅक नुकताच लाँच करण्यात आला आहे. या पॅकसोबत ५ जीबी डेटा देण्यात येत असून याची वैधताही सध्याच्या पॅकवर अवलंबून असेल. या पॅकसोबत ३० दिवसांसाठी विंक प्रिमिअम सबस्क्रिप्शन आणि अनलिमिटेड हेल्लो ट्यूनचा लाभ घेता येऊ शकतो.
5 / 10
८९ रूपयांचा एअरटेलचा हा प्लॅन २८ दिवसांच्या प्राईम व्हिडीओ मोबाईल एडिशनसह मिळतो. या प्लॅनसोबत ६ जीबी डेटा देण्यात येत असून याची वैधताही विद्यमान पॅक एवढीच असते. याव्यतिरिक्त युझर्सना मोफत हॅलोट्यून आणि एअरटेल एक्सट्रिम अॅपची मेंबरशिपही देण्यात येते.
6 / 10
एअरटेलच्या ९८ रूपयांच्या पॅकमध्ये ग्राहकांना १२ जीबी डेटा देण्यात येतो. तसंच यामध्येही विद्यमान पॅकइतकीच वैधता देण्यात येते. यात अन्य कोणत्याही सुविधा देण्यात येत नाही.
7 / 10
एअरटेलचा १३१ रूपयांचा पॅक हा अन्य पॅकपेक्षा थोडा निराळा आहे. यामध्ये १०० एमबी डेटा देण्यात येतो. परंतु या सोबत अॅमेझॉन प्राईमचं सबस्क्रिप्शन ३० दिवसांकरिता देण्यात येतं. तसंच हा पॅक एअरटेलच्या अॅक्टिव्ह बंडल आणि स्मार्ट पॅक युझर्ससाठी उपलब्ध आहे.
8 / 10
एअरटेलचा २४८ रूपयांचा पॅक नुकताच लाँच करण्यात आला आहे. यामध्ये एका वर्षासाठी विंक म्युझिकची मेंबरशीप आणि २५ जीबी डेटा देण्यात येतो. याव्यतिरिक्त हॅलोट्यून्स आणि विंक वर लाईव्ह कॉन्सर्ट ऐकण्याचाही आनंद घेता येतो.
9 / 10
एअरटेलचा २५१ रूपयांचा प्लॅन लॉकडाऊनदरम्यान लाँच करण्यात आला होता यामध्ये युझरला ५० जीबी डेटा देण्यात येतो. तसंच विद्यमान प्लॅनपर्यंतच या पॅकचीही वैधता असते.
10 / 10
४०१ रूपयांचा डेटा पॅक हा एअरटेलचा सर्वात महागडा डेटा पॅक आहे. यामध्ये Disney+ Hotstar VIP चं सबस्क्रिप्शन मिळतं. तसंच यासोबत २८ दिवसांसाठी ३० जीबी डेटा देण्यात येतो. Disney+ Hotstar VIP चं या प्लॅनसोबत एका वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळतं.
टॅग्स :Airtelएअरटेलamazonअ‍ॅमेझॉनInternetइंटरनेट