शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Alert BOB: बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असाल तर २४ मार्च पूर्वी करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाऊंट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 9:59 AM

1 / 8
तुम्ही बँक ऑफ बडोदाचे (Bank of Baroda) ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेनं आपल्या ग्राहकांना त्यांची 'नो युवर कस्टमर्स' (KYC) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यास सांगितलं आहे.
2 / 8
असं न करणाऱ्या ग्राहकांना समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यांची बँक खातीही निष्क्रिय केली जाऊ शकतात. बँकेनं यासंदर्भात ग्राहकांना सूचनाही दिली आहे. फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) देशातील सर्व बँकांना KYC करून घेण्याचा सल्ला दिला आहे.
3 / 8
२४ मार्च २०२३ पर्यंत सर्व ग्राहकांनी सेंट्रल केव्हायसी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असल्याचं ट्वीट केलं आहे. बँकेनं यासंदर्भात आपल्या ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती दिली आहे. असं न करणाऱ्या ग्राहकांची खाती बंद होऊ शकतात.
4 / 8
ज्या ग्राहकांना नोटीस अथवा एसएमएसद्वारे ही माहिती देण्यात आली आहे त्यांनी लवकरात लवकर आपल्या ब्रान्चमध्ये जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तसंच ग्राहकांना २४ मार्च पूर्वी हे काम पूर्ण करावं लागणार आहे.
5 / 8
CKYC द्वारे, बँका त्यांच्या ग्राहकांचा डेटा डिजिटल स्वरूपात सेव्ह करतात. यापूर्वी, ग्राहकांना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कारणांसाठी केव्हायसी करावं लागत होतं. मात्र सेंट्रल केवायसीनंतर ग्राहकांना त्याची वारंवार गरज भासत नाही.
6 / 8
यापूर्वी, जीवन विमा खरेदी करणं आणि डीमॅट खाते उघडणं यासारख्या कामांसाठी वेगळं केव्हायसी करावं लागत होतं. मात्र आता सेंट्रल केवायसीनंतर सर्व काम एकाच वेळी सहज पूर्ण करता येणार आहेत.
7 / 8
केव्हायसी अपडेट करण्यासाठी ग्राहकांना पत्त्याचा पुरावा, फोटो, पॅन, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक द्यावा लागतो. दस्तऐवज अपडेट झाल्यानंतर, आवश्यक असल्यास, बँक ते तुमच्याद्वारे प्रदान केलेल्या डेटाशी जुळवते. ते योग्य असल्यास तुमचं काम पूर्ण झालं.
8 / 8
तपशील जुळत नसल्यास, बँक कागदपत्रांची पुन्हा पडताळणी करू शकते. अशा प्रकारे एखाद्याला फसवणूक करायची असली तरी ते शक्य होत नाही. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीचा धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना नियमितपणे KYC अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.
टॅग्स :bankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक