शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंबानी कपलच्या एंट्रीकडे सगळ्यांच्या नजरा, दीपिकासोबत रंगल्या गप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 12:58 PM

1 / 10
उद्योगपती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा जानेवारी महिन्यात 'अँटेलिया' निवासस्थानी कुटुंब, मित्र आणि आदरणीय परंपरांद्वारे औपचारिकपणे साखरपुडा संपन्न झाला.
2 / 10
अंबानी आणि मर्चंट कुटुंबात १९ जानेवारी रोजी हा सुखद सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर आठ दिवसांत नवं अंबानी कपल तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचलं होतं.
3 / 10
तिरुपती मंदिरात विधीव्रत पूजा-आरतीही केली होती. यावेळी, अनंत यांनी पांढरं शुभ्र धोतर व सदरा तर राधिकाने सलवार-कुर्ता परिधान केला होता. त्यांच्या सोबतीला अंबानी कुटुंबाचे काही स्नेही होते. तसेच मंदिर देवस्थानाचे विश्वस्त देखील होते.
4 / 10
त्यानंतर, पुन्हा एकदा हे अंबानी कपल एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. ब्लॅक ड्रेसमधील या कपलची ब्युटी सध्या चर्चेचा विषय आहे. एका सेंटरच्या उद्घाटनसाठी अंबानी कुटुंब एकत्र आलं होतं.
5 / 10
मुंबईत निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्यासाठी संपूर्ण अंबानी कुटुंब एकत्र जमलं. त्यासाठीच, अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट पती अनंत अंबानी यांच्यासमवेत दिसून आली.
6 / 10
राधिकाने ब्लॅक कलरची साडी परिधान केली होती, त्यामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. तर, अनंत अंबानी यांनीही काळ्याच रंगाचा जोधपुरी परिधान केला होता.
7 / 10
राधिका आणि अनंत हातात हात घालून या सोहळ्याला आले, त्यामुळे, सर्वांचेच लक्ष या नव्या जोडप्याकडे लागले होते.
8 / 10
गळ्यात नेकलेस, कानात रिंग, मोकळे सोडलले केस आणि काळ्या रंगाच्या साडीत राधिका अतिशय सुंदर दिसत होती. तर, दोघांची पारंपरिक वेशभूषेतील जोडीही नंबर १ वाटत होती.
9 / 10
या अंबानी कपलचे या सोहळ्यातील फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे दोघांनीही एकत्र पोज देत फोटोशूटही केलं.
10 / 10
विशेष म्हणजे या सोहळ्यात अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि राधिका यांनी बराच वेळ गप्पाही मारल्या.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीDeepika Padukoneदीपिका पादुकोणRelianceरिलायन्स