Amazing offer of Air India for Republic Day, fly for just Rs 1705; Only 2 days left
Air India ची भन्नाट ऑफर, अवघ्या १७०५ रुपयांत करा विमान प्रवास; उरले फक्त २ दिवस By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 12:49 PM1 / 8जर फेब्रुवारी महिन्यात बाहेर फिरण्याचा प्लॅन बनवत असाल तर एअर इंडिया(Air India) स्वस्तात तिकीट बुकींग करण्याची संधी देत आहे. एअरलाईन तिकीटावर सेल आला आहे. ज्यामुळे तुम्हाला १,७०५ रुपयांत तिकीट बुकींग करता येऊ शकते. 2 / 8एअर इंडिया रिपब्लिक डे(Republic Day) निमित्ताने हा सेल आणला आहे. ज्यामुळे स्वस्त दरात तिकीट उपलब्ध होणार आहे. एअर इंडियाच्या या सेलची सुरुवात २१ जानेवारी ते २३ जानेवारीपर्यंत असेल. म्हणजे तुमच्याकडे स्वस्तात तिकीट घेण्यासाठी २ दिवसांची संधी आहे. 3 / 8एअर इंडियाच्या वेबसाईटनुसार, प्रवासी २१ जानेवारी ते २३ जानेवारी २०२३ या काळात १ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत प्रवासासाठी तिकीट बूक करू शकतात. हा सेल एअर इंडियाच्या सर्व सिटी ऑफिस, एअरपोर्ट ऑफिस, वेबसाईट, मोबाईल App आणि ट्रॅव्हल एजेंटकडे उपलब्ध आहे. 4 / 8प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तिकीटाच्या सुरुवातीची किंमत असणार आहे. ही ऑफर फक्त इकोनॉमी क्लासच्या तिकीटावर उपलब्ध आहे. १ फेब्रुवारी ते ३० सप्टेंबर २०२३ या काळात देशातंर्गत विमान प्रवासासाठी मर्यादित असेल. 5 / 8एअर इंडियाकडून एकूण ४९ डेस्टिनेशनसाठी तिकीट बुकींग सुरू आहे. तिकीटाच्या सुरुवातीची किंमत १७०५ रुपये इतकी आहे. टेक ओवरनंतर टाटा ग्रुप एअर इंडियाला नव्या रुपाने मार्केटमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. 6 / 8एअरलाईनच्या समुहात नवीन विमान जोडण्याचाही टाटाचा मानस आहे. २७ जानेवारी २०२२ रोजी, एअर इंडियाची मालकी अधिकृतपणे तब्बल ६९ वर्षांनी टाटा समूहाकडे परतली. समूहाची होल्डिंग कंपनी Tales Pvt Ltd ने ऑक्टोबर २०२१ मध्ये कर्जबाजारी एअर इंडियाचे अधिग्रहण करण्यासाठी १८००० कोटी रुपयांची बोली जिंकली. 7 / 8यानंतर अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण होण्यास सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागला. विस्तारा एअरलाइन्सच्या एअर इंडियामध्ये विलीनीकरणाचा मार्गही मोकळा झाला आहे. या विलीनीकरणानंतर एअर इंडिया भारतातील आघाडीची विमान कंपनी बनणार आहे. 8 / 8या प्रक्रियेअंतर्गत, सिंगापूर एअरलाइन्सने व्यवहाराचा भाग म्हणून एअर इंडिया इंडियामध्ये २०५८५ दशलक्ष रुपयांची गुंतवणूक केली आहे. याद्वारे SIAला एअर इंडिया समूहातील २५.१% हिस्सा मिळेल. दोन्ही एअरलाइन्सचे नियामक मंजुरी प्रलंबित असून मार्च २०२४ पर्यंत विलीनीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications