शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अ‍ॅमेझॉनसोबत काम करून ३ लाख रुपये कमवा; दररोज द्यावे लागणार फक्त ६ तास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 12:22 PM

1 / 9
तुम्ही फुल टाईम किंवा पार्ट टाईम कामाच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. ऍमेझॉनच्या फ्लेक्स सेवेच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
2 / 9
फ्लेक्स सेवेच्या माध्यमातून ऍमेझॉन डिलिव्हरी पार्टनर होण्याची संधी देते. या माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्ती वर्षाकाठी ३ लाखापर्यंतची कमाई करू शकतात. विशेष म्हणजे यासाठी ८ ते १० तास काम करण्याची गरज लागत नाही.
3 / 9
ऍमेझॉन फ्लेक्सच्या अधिकृत संकेतस्थळावरील FAQ पेजवर याबद्दलची सर्व माहिती उपलब्ध झाली. आम्ही तिच माहिती साध्या सोप्या शब्दांत देत आहोत. ऍमेझॉनचे डिलिव्हरी पार्टनर करण्यासाठी सर्वात आधी ऍमेझॉन फ्लेक्स ऍप डाऊनलोड करा.
4 / 9
ऍप डाऊनलोड केल्यावर त्यात तुमचं नाव, मोबाईल क्रमांक, इमेल, तुमच्याकडे असलेल्या वाहनाची माहिती भरा. त्यानंतर स्वत:ला ऍपवर रजिस्टर करा. यानंतर तुमच्या ऍमेझॉन अकाऊंटवरून लॉग-इन करा. ऍमेझॉन अकाऊंट नसल्यास नवं अकाऊंट तयार करा.
5 / 9
तुमची पार्श्वभूमी तपासून पाहण्यासाठी ऍपमध्ये काही माहिती भरावी लागते. त्यानंतर तुम्ही सेवा देऊ शकाल असा परिसर निवडा. कर भरणा आणि पेमेंटसाठी तुम्हाला आणखी काही माहिती ऍपवर नोंदवावी लागते.
6 / 9
ऍमेझॉनसोबत काम करण्यासाठी तुमचं वय १८ वर्षे पूर्ण असायला हवं. तुमच्याकडे एक एँड्रॉईड फोन असावा. त्यात किमान २ जीबीचा रॅम असावा. फोनमध्ये फ्लॅश असलेला कॅमेरा, जीपीएस लोकेशन सर्व्हिस, व्हॉईस डेटा कनेक्टिव्हिटी असावी.
7 / 9
तुमच्याकडे एक वाहन असणं अतिशय गरजेचं आहे. याशिवाय वैध वाहन चालक परवाना हवा. वैध आरसी, विमा प्रमाणपत्र, पीयूसी असणं आवश्यक आहे. यासोबतच पॅन कार्ड, बँकेत एक सेव्हिंग आणि करंट अकाऊंट गरजेचं आहे.
8 / 9
ऍमेझॉननं दिलेल्या माहितीनुसार डिलिव्हरी पार्टनर दर तासाला १२० ते १४० रुपये कमावतात. ते दर दिवशी जास्तीत जास्त ६ तास काम करू शकतात. यानुसार महिन्याला २५ हजार आणि वर्षाकाठी ३ लाखांची कमाई करू शकतात.
9 / 9
डिलिव्हरी पार्टनर म्हणून दिवसाला ४ तास काम केल्यास महिन्याला १७ हजार रुपये आणि वर्षाकाठी २ लाख रुपये कमाई करू शकतात. डिलेव्हरी पार्टनरच्या पगारातून १ टक्का कर म्हणून कापला जातो.
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉन