शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Amazon India: कमाईची सुवर्ण संधी! 4 तास काम अन् 60 हजार रुपये पगार, पहा Amazonची खास ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 7:28 PM

1 / 6
Earn With Amazon: तुमची सध्याची पगार अपुरी पडत असेल आणि तुम्ही कमाईच्या दुसऱ्या स्त्रोताचा (Second Income) विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला एक असा मार्ग सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही फक्त 4 तास काम करून महिन्यात 60,000 रुपये कमवू शकता.
2 / 6
ही सुवर्ण संधी तुम्हाला देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी देत आहे. अॅमेझॉन(Amazon) तुमच्यासाठी कमाईची एक जबरदस्त संधी घेऊन आली आहे, ज्याद्वारे तुम्ही पार्ट टाइम काम करुन मोठी रक्कम कमवू शकता. आजकाल ऑनलाइन शॉपिंगची क्रेझ खूप वाढत आहे, ज्यामुळे कंपनीला प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात डिलिव्हरी बॉईज किंवा डिलिव्हरी गर्ल्सची गरज आहे.
3 / 6
डिलिव्हरी करणाऱ्याला अॅमेझॉनच्या गोदामातून पार्सल घेऊन ग्राहकापर्यंत पोहचवावे लागेत. एका डिलिव्हरी बॉयला एका दिवसात 100 ते 150 पॅकेज डिलिव्हर करावे लागतात. आपण दिल्लीबद्दल बोललो तर अमेझॉनची येथे सुमारे 18 सेंटर्स आहेत. कंपनीने जवळजवळ देशातील सर्व शहरांमध्ये आपली केंद्रे उघडली आहेत. पॅकेज योग्य ग्राहकापर्यंत पोहचवणे, हे डिलिव्हरी बॉय किंवा गर्लचे काम असते.
4 / 6
डिलिव्हरी बॉयचे काम करण्यासाठी तुमच्याकडे एक बाईक किंवा स्कूटर असणे गरजेचे आहे. याशिवाय, तुमच्याकडे वाहन चालवण्याचे लायसन्सही असायला हवे. डिलिव्हरी बॉयची नोकरी करण्यासाठी तुम्हाला थेट अॅमेझॉनच्या साइट (https://logistics.amazon.in/applynow ) वर अप्लाय करावे लागेल.
5 / 6
विशेष म्हणजे, अॅमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयला दिवसभर काम करावे लागणार नाही. अमेझॉन सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत डिलिव्हरी करते. काही डिलिव्हरी बॉय दिवसातीन 4-5 तासात 100-150 पॅकेज डिलिव्हर करतात. विशेष म्हणजे, यासाठी तुम्हाला उच्च शिक्षित किंवा डिग्री होल्डर असण्याची गरज नाही.
6 / 6
पगाराबद्दल बोलायचे झाल्यास, डिलिव्हरी बॉयची फिक्स्ड सॅलरी 15 हजार महिना असते. याशिवाय, एका पॅकेजवर यांना 10-15 रुपये मिळतात. डिलिव्हरी कंपनीनुसार, एखाद्या व्यक्तीने महिनाभर काम केले आणि रोज 100 पॅकेज डिलिव्हर केले, तर महिन्याला 55000 ते 60000 रुपये कमाई होते.
टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनbusinessव्यवसायInvestmentगुंतवणूक