Ambani-Adani Update: First time Ambani-Adani deal, Reliance buys 26% stake in Adani's company
पहिल्यांदाच अंबानी-अदानींमध्ये करार, रिलायन्सने अदानींच्या कंपनीत खरेदी केला 26% हिस्सा... By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 9:37 PM1 / 5Ambani-Adani Update: भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स इंडस्ट्रीजने त्यांचे प्रतिस्पर्धी उद्योगपती गौतम अदानी, यांच्या अदानी पॉवर कंपनीसोबत करार केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने अदानी पॉवरच्या मध्य प्रदेशातील एका वीज प्रकल्पात 26 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. विशेष म्हणजे, या दोन दिग्गज अब्जाधीश उद्योगपतींमध्ये करार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2 / 5 रिलायन्स इंडस्ट्रीजने अदानी पॉवर प्लांटमधून निर्माण होणारी 500 मेगावॅट वीज वापरण्यासाठी अदानी पॉवरसोबत करार केला आहे. या दोन्ही कंपन्यांनी स्टॉक एक्स्चेंजमध्ये दाखल केलेल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये सांगितले की, रिलायन्स अदानी पॉवर लिमिटेडच्या मालकीची कंपनी असलेल्या महान एनर्जी लिमिटेडमध्ये प्रत्येकी 10 रुपये (50 कोटी रुपये) चे दर्शनी मूल्याचे पाच कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करेल आणि वैयक्तिक वापरासाठी 500 मेगावॅट उत्पादन क्षमतेचा वापर करेल. 3 / 5 गुजरातचे हे दोन उद्योगपती एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर येण्यासाठी या दोन्ही उद्योगपतींमध्ये अनेक वर्षांपासून रस्सीखेच सुरू असते. मुकेश अंबानी ऑईल अँड गॅस, रिटेल आणि दूरसंचारसह अनेक व्यवसायात गुंतलेले आहेत, तर अदानी पोर्ड, विमानतळ, सिमेंट, कोळसा आणि खाणकामासह पायाभूत सुविधांच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. मात्र, ग्रीन एनर्जी व्यवसायात दोन्ही समूह एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.4 / 5 अदानी समूह 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठा ग्रीन एनर्जी उत्पादक बनण्याची आकांक्षा बाळगतो, तर रिलायन्सदेखील गुजरातच्या जामनगरमध्ये चार गिगाफॅक्टरी बांधत आहे. यातील प्रत्येक कारखाना सौर पॅनेल, बॅटरी, ग्रीन हायड्रोजन आणि इंधन सेलसाठी आहे. अदानी समूहदेखील सौर मॉड्यूल्स, विंड टर्बाइन आणि हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर्स तयार करण्यासाठी तीन गिगाफॅक्टरी उभारत आहे.5 / 5 अदानी समूहाने 5G स्पेक्ट्रम लिलावात अर्ज केला होता, तेव्हाही या दोन समूहांमध्ये संघर्ष होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, नंतर अदानी समूहाने 26 GHz बँडमध्ये 400 MHz स्पेक्ट्रम खरेदी केले, जे सार्वजनिक नेटवर्कसाठी नाही. एकमेकांचे प्रतिस्पर्धी असूनही दोन्ही उद्योगपतींमध्ये चांगली मैत्री आहे. अलीकडेच जामनगरमध्ये मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी, याच्या लग्नाच्या सोहळ्यात गौतम अदानी उपस्थित होते. आणखी वाचा Subscribe to Notifications