शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंबानींच्या सुनेची पर्स चर्चेत, पर्सच्या किंमतीत तुम्ही गावी बांधू शकाल बंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 2:23 PM

1 / 10
देशातील गर्भश्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि मर्चंट कुटुंबात १९ जानेवारी रोजी अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा झाला. या सोहळ्यानंतर आठ दिवसांत नवं अंबानी कपल तिरुपतीच्या दर्शनाला पोहोचलं होतं.
2 / 10
अंबानी कुटुंबातील हे नवं कपल वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळते. दोन दिवसांपूर्वी मुंबईत निता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात पुन्हा एकदा हे कपल चर्चेचा विषय ठरलं.
3 / 10
राधिकाने ब्लॅक कलरची साडी परिधान केली होती, त्यामध्ये तिचं सौंदर्य अधिकच खुललं होतं. तर, अनंत अंबानी यांनीही काळ्याच रंगाचा जोधपुरी परिधान केला होता.
4 / 10
गळ्यात नेकलेस, कानात रिंग, मोकळे सोडलले केस आणि काळ्या रंगाच्या साडीत राधिका अतिशय सुंदर दिसत होती. तर, तिच्या हातातील लहानशी पर्सही अनेकांच्या नजरेत पडली.
5 / 10
राधिकाच्या हातातील या छोट्याशा पर्सच्या किंमतीवरुन आता सोशल मीडियात चर्चा होत आहे. कारण, या पर्सच्या किंमतीत तुम्ही गावाकडं मस्त बंगला बाधू शकता, एवढी या पर्सची किंमत आहे.
6 / 10
Hermes Kellymorphose' अशी छोटीशी सिल्व्हर रंगाची ज्वेलरी पर्स राधिकाच्या हातात होती. या आर्म कँडी बॅगची किंमत तब्बल ५२ लाख ३० हजार रुपये एवढी असल्याची माहिती समोर आली आहे.
7 / 10
राधिकाने आपल्या करिअरची सुरुवात एका रिअल इस्टेट कंपनीत ज्युनियर सेल्स मॅनेजर म्हणून केली होती. राधिका ही एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे. व्यापारी कुटुंब गुजरातच्या कच्छ भागातील आहे.
8 / 10
१८ डिसेंबर १९९४ रोजी जन्मलेल्या राधिका मर्चंटने न्यूयॉर्कमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर इंडिया फर्स्ट ऑर्गनायझेशनमध्ये इंटर्नशिप केली.
9 / 10
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राधिका मर्चंट आलिशान आयुष्य जगते. ती डिझायनर कपडे घालते. तसेच, तिला महागड्या बॅग्सचाही शौक आहे. राधिका मर्चंट खूप स्टायलिश आहे.
10 / 10
तिला नृत्य, पोहणे आणि पुस्तके वाचण्याची आवड आहे. इंस्टाग्रामवर तिचे ६० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. राधिकाच्या वडिलांची एकूण संपत्ती ७५५ कोटी रुपये आहे. तर राधिकाच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, ती सुमारे ८ ते १० कोटी रुपयांची मालकीन आहे.
टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMumbaiमुंबईnita ambaniनीता अंबानी