शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टाटांशी पंगा घेतला, वॉरन बफेटने चिनी कंपनीला धक्का दिला; गुंतवणुकीतून ५ वेळा हिस्सा काढला!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 11:36 AM

1 / 9
गेल्या काही वर्षांपासून भारतातील इलेक्ट्रिक व्हेइकल क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या ईव्ही क्षेत्रात टाटा मोटर्सचे वर्चस्व असून, टाटांच्या एकापेक्षा एक परवडणाऱ्या दमदार ईव्ही कारमुळे या स्पर्धेत टाटा आघाडीवर आहे. यातच नवनवीन कार कंपन्या भारतात आपल्या ईव्ही कार लॉंच करत आहेत.
2 / 9
चीनची BYD कंपनी भारतात आपले पाय रोवू पाहत आहे. आतापर्यंत या कंपनीच्या २ ईव्ही कार लाँच झाल्या आहेत. पहिली कार केवळ बिझनेस करणाऱ्यांसाठी होती. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ती उपलब्ध करून देण्यात आलेली नव्हती. यातच आता कंपनीने आपली दुसरी ईव्ही कार सादर केली आहे.
3 / 9
ईव्ही क्षेत्रात दबदबा असणाऱ्या TATA साठी BYD कंपनी चांगली स्पर्धा निर्माण करू शकेल, असे सांगितले जात आहे. मात्र, चीनमधील या कंपनीला अमेरिकेचे दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी मोठा धक्का दिला आहे. ऑगस्टपासून बफे यांनी या कंपनीतील आपला हिस्सा पाच वेळा विकला आहे.
4 / 9
यापूर्वी त्यांनी या कंपनीतील त्यांची गुंतवणूक १४ वर्षे कायम ठेवली होती. आता त्यांची BYD मधील हिस्सेदारी १५.९९ टक्क्यांवर आली आहे. वॉरन बफे यांनी कंपनी बर्कशायर हॅथवेने गेल्या आठवड्यात BYD चे ३२ लाख शेअर्स विकले. ही चीनी वाहन कंपनी हाँगकाँगमध्ये सूचीबद्ध आहे.
5 / 9
बर्कशायर हॅथवेने या चिनी कंपनीचे शेअर्स नोव्हेंबरमध्ये तीन वेळा विकले आहेत. कंपनीने ऑगस्टमध्ये पहिल्यांदा शेअर्स विकले तेव्हा कंपनीकडे २२.५ कोटी शेअर्स होते. बफे यांच्या कंपनीने २००८ मध्ये BYD चे शेअर्स प्रती शेअर १.०२ डॉलरला विकत घेतले आणि एकूण २३ कोटी डॉलरची गुंतवणूक केली.
6 / 9
त्यानंतर जागतिक आर्थिक संकटामुळे कंपनीचे शेअर्स विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले होते. नीचांकी पातळीला आल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी आली आहे. वर्ष २०२० मध्ये BYD शेअर्स ४३७ टक्के वाढले.
7 / 9
इलॉन मस्क यांच्या टेस्लाला मागे टाकून ही कंपनी चीनमध्ये सर्वाधिक विकली जाणारी ईव्ही ब्रँड बनली आहे. गेल्या महिन्यात कंपनीने चीनमध्ये १०३,१५७ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली तर टेस्लाने ७१,७०४ युनिट्सची विक्री केली. BYD च्या शेअर्सने जूनमध्ये ४२ डॉलरचा विक्रमी उच्चांक गाठला.
8 / 9
ही शेअर्सची किंमत १४ वर्षांपूर्वीच्या ४१ पट जास्त आहे. यामुळेच बर्कशायर त्यावर प्रचंड नफा कमावत आहेत. गेल्या चार महिन्यांत त्यांनी BYD चे ४.९ कोटी शेअर्स विकले आहेत. BYD ने गेल्या महिन्यात भारतात आपली Atto ३ इलेक्ट्रिक SUV लाँच केली.
9 / 9
कंपनी जगातील अनेक देशांमध्ये इलेक्ट्रिक कार आणि प्लग-इन इलेक्ट्रिक हायब्रीड्स विकत आहे. यामध्ये नॉर्वे, न्यूझीलंड, सिंगापूर, ब्राझील, कोस्टा रिका आणि कोलंबिया यांचा समावेश आहे. कंपनीने २००७ मध्ये भारतात प्रवेश केला. कंपनीचा प्लांट चेन्नईजवळ आहे. सुरुवातीला ते मोबाईल फोनसाठी बॅटरी आणि पार्ट तयार करायचे.
टॅग्स :TataटाटाElectric Carइलेक्ट्रिक कारAmericaअमेरिका