शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ओमायक्रॉनची भीती! 67 टक्के कर्मचाऱ्यांना पाहिजेत 'Work From Home', कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणातून आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2022 12:03 PM

1 / 8
नवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागले आहेत. कोरोना रुग्ण वाढीला नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन जबाबदार असल्याचे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे.
2 / 8
केंद्र सरकारने लोकांना कोरोनाशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. राज्यांमधील कोरोनाची वाढती संख्या पाहात ऑफिसमध्ये काम करणारे 67 टक्के कर्मचारी घरून काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) इच्छुक आहेत. या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंट पाहता 'वर्क फ्रॉम होम' अनिवार्य केले पाहिजे. तीनपैकी दोन कर्मचारी घरून काम करू इच्छितात.
3 / 8
लोकल सर्किलद्वारे केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, 58 टक्के कर्मचारी सध्या आपल्या ऑफिसमध्ये काम करत आहेत. यापैकी 36 टक्के कर्मचारी म्हणतात की, आपल्या ऑफिसमध्ये एअर व्हेंटिलेशनची चांगली व्यवस्था आहे.
4 / 8
लोकल सर्किलने आपल्या सर्वेक्षणातून कर्मचाऱ्यांचे मत जाणून घ्यायचे होते. ऑफिसमध्ये एअर व्हेंटिलेशनची योग्य व्यवस्था, 'वर्क फ्रॉम होम'बाबत कर्मचाऱ्यांचे मत यासह अनेक मुद्द्यांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणात 28 हजार कर्मचाऱ्यांनी आपला अभिप्राय दिला. यामध्ये 63 टक्के पुरुष तर 37 टक्के महिला होत्या.
5 / 8
देशातील ओमायक्रॉन व्हेरिएंटची वाढती प्रकरणे आणि ऑफिसेसमध्ये होणारी गर्दी आणि पुरेशा एअर व्हेंटिलेशनचा अभाव लक्षात घेऊन, सर्वेक्षणात 67 टक्के कर्मचाऱ्यांनी असे म्हटले आहे की, सरकारने डेस्क जॉब करणार्‍या लोकांसाठी वर्क फ्रॉम होम अनिवार्य केले पाहिजे.
6 / 8
दरम्यान, कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानंतर, राज्य सरकारांनी सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालयांना अर्ध्या क्षमतेने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या तीनपैकी दोन जणांचे मत आहे की, तीन महिन्यांत देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आवश्यक निर्बंध आणि उपाययोजनांचा विचार केला पाहिजे.
7 / 8
लोकल सर्किलचे संस्थापक आणि चेअरमन सचिन तापडिया यांनी अमर उजाला या हिंदी वेबसाइटला सांगितले की, अमेरिकेतील सेंटर फॉर एपिडेमिक कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने इशारा दिला आहे की SARS-Cov-2 चे सूक्ष्म कण घराबाहेरील भागापेक्षा जास्त वेगाने पसरतात.
8 / 8
त्यामुळे ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करणाऱ्या आणि गर्दी करणाऱ्या बहुतांश भारतीयांच्या चिंता वाढल्या आहेत. कारण, अनेक ऑफिसेसमध्ये गर्दीशिवाय एअर व्हेंटिलेशनची पुरेशी आणि चांगली व्यवस्था नाही.
टॅग्स :Employeeकर्मचारीOmicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या