शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रिक्षावाल्याची भन्नाट कल्पना आवडली, आनंद महिंद्रानी ऑफरच दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 4:01 PM

1 / 10
प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. विविध विषयांवर आपल्या खुमासदार शैलीत आनंद महिंद्रा ट्विटरवर व्यक्त होत असतात.
2 / 10
याव्यतिरीक्त महिंद्रा यांना अनेक नवनवीन कल्पनांबद्दल नेटकऱ्यांशी बोलणं, त्यांना चालना देतानाही आपण सर्वांनी पाहिलं आहे. सध्या करोना विषाणूमुळे संपूर्ण देशभरात गंभीर वातावरण आहे.
3 / 10
या लॉकडाउनच्या काळात पश्चिम बंगालमधल्या एका रिक्षावाल्याने सोशल डिस्टन्सिंगचं भान राखण्यासाठी एक भन्नाट युक्ती शोधून काढली आहे. सोशल मीडियावर या रिक्षावाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, आनंद महिंद्रा भलतेच खुश झाले आहेत.
4 / 10
सोशल डिस्टन्सिंगचं भान राखण्यासाठी या रिक्षावाल्याने प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या जागेचे ४ भाग केले आहेत. यासाठी रिक्षावाल्याने वापरलेली युक्ती पाहिल्यानंतर महिंद्रा यांनी आपल्या Auto and Farm सेक्टरचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जेजुरीकर यांना ट्विटमध्ये टॅग करत, या रिक्षावाल्याला आपल्या टीममध्ये घ्यायला हवं असं म्हटलं आहे.
5 / 10
पश्चिम बंगालमधील या रिक्षावाल्याने सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवत कमी जागेतही सुरक्षित वाहतूक सेवा देण्याचं काम केलंय. त्यामुळे चक्क आनंद महिंद्रानीचं त्याचं कौतुक केलंय
6 / 10
महिंद्रा यांच्या या ट्विटला अनेकांचे रिप्लाय आले आहेत. गरज ही शोधाची जननी आहे, असेही अनेकांनी म्हटलंय.
7 / 10
यारिक्षावाल्याने एका ऑटोत ४ व्यक्ती एकमेकांच्या संपर्काशिवाय बसू शकतील, अशी व्यवस्था केलीय.
8 / 10
यापूर्वीही एका केरळमधील रिक्षावाल्याने आपल्या ऑटो रिक्षाला चक्क स्कॉर्पिओचा लूक दिला होता.
9 / 10
त्यावेळीही महिंद्रा यांनी या रिक्षावाल्याचं कौतुक करत, त्यास ती रिक्षा आमच्या संग्रहालयासाठी देण्याचं आवाहन केलं होता. त्याबदल्यात त्यास दुसर चारचाकी वाहन देण्यात आलं होतं.
10 / 10
महिंद्राच्या या आयडियाच्या कल्पना पाहिल्यावर, गाडी घेणं खरंच सोप्पय फक्त आनंद्र महिंद्रांच्या ट्विटवरवर आपल्याला जागा मिळाली पाहिजे, असेच म्हणता येईल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याonlineऑनलाइनMahindraमहिंद्राTwitterट्विटरauto rickshawऑटो रिक्षा