शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१७ हजार कोटींची संपत्ती, शेकडो वर्ष जुन्या घरात राहतात आनंद महिंद्रा; काय आहे यात असं खास?

By जयदीप दाभोळकर | Updated: April 9, 2025 13:58 IST

1 / 6
महिंद्रा अँड महिंद्राची वाहनं जितकी लोकप्रिय आहेत, तितकेच त्यांचे मालक आनंद महिंद्राही प्रसिद्ध आहेत. सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांच्या पोस्टना लोकांकडून पसंती मिळत असते. आनंद महिंद्रा आपल्या ट्वीट आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी जोडलेले असतात. कोट्यवधींची संपत्ती असलेले आनंद महिंद्रा तितकंच साधं जीवन जगतात. आनंद महिंद्रा यांच्याकडे अफाट संपत्ती आहे, ते आरामात बंगला किंवा मोठं बहुमजली घर बांधू शकतात, पण आनंद महिंद्रा शेकडो वर्ष जुन्या घरात राहतात.
2 / 6
महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा यांची एकूण संपत्ती १७ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे. दरम्यान, आनंद महिंद्रा आलिशान बंगला किंवा बहुमजली इमारतीत राहत नाहीत, तर ते शेकडो वर्षे जुन्या घरात राहतात. हे घर त्याच्या हृदयाच्या अगदी जवळ आहे. ज्या बंगल्यात ते पूर्वी भाडेकरू होते तोच बंगला त्यांनी विकत घेतला आणि आता त्याच बंगल्यात वर्षानुवर्षे कुटुंबासह राहत आहेत. आता प्रश्न असा आहे की, त्या बंगल्यात असं काय होतं की महिंद्रांनी ते जुनं घर विकत घेतले. मुंबईतील नेपियन सी रोडवर बांधण्यात आलेल्या या तीन मजली घरात महिंद्रा वर्षानुवर्षे राहत आहेत.
3 / 6
खरं तर नेपियन सी रोडवर बांधलेलं हे तीन मजली घर तेच घर आहे जिथे आनंद महिंद्रा यांचं बालपण गेलं होतं. आनंद महिंद्रा यांचे आजोबा केसी महिंद्रा मुंबईत आल्यानंतर पहिल्यांदा या घरात स्थायिक झाले. या घराचे मालक आपल्या गाड्या इथेच पार्क करायचे आणि नंतर त्यांनी ते भाड्याने दिलं. केसी महिंद्रा कुटुंबासोबत भाडेकरू म्हणून राहत होते. महिंद्रा यांचं कुटुंब जेव्हा त्या घरात आले, तेव्हा आनंद महिंद्रा यांचा जन्मही झाला नव्हता, पण नंतर त्यांचं बालपण याच घरात गेलं. वर्षानुवर्षे ते कुटुंबासह एकाच घरात राहत आहेत.
4 / 6
नंतर महिंद्रा यांचं कुटुंब येथून दुसरीकडे गेलं. हे घर दुसऱ्या व्यक्तीनं विकत घेतलं होतं. पण अचानक एके दिवशी महिंद्रा यांना कळलं की त्या घराच्या नवीन मालकानं घराच्या नूतनीकरणाच्या नावाखाली ते पाडण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद महिंद्रा यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचताच ते अस्वस्थ झाले. २७० कोटी रुपये देऊन त्यांनी ते जुनं घर विकत घेतलं. या घराला त्यांनी 'गुलिस्तान' असं नाव दिलंय.
5 / 6
आनंद महिंद्रा यांच्या या घराचे नाव गुलिस्तान म्हणजेच फुलांचा गुलदस्ता आहे. हे घर घेतल्यापासून आनंद महिंद्रा याच घरात राहतात. लक्झरी आयुष्य जगण्याऐवजी त्यांनी जुन्या आठवणींची निवड केली. या तीन मजली इमारतीचं नूतनीकरण केल्यानंतर ते आता आपल्या कुटुंबासह येथे राहतात. आनंद महिंद्रा यांच्या दोन्ही मुली परदेशात असतात.
6 / 6
आनंद महिंद्रा यांच्या पत्नी पत्रकारितेच्या क्षेत्राशी संबंधित आहेत. अनुराधा यांनी मुंबईतील सोफिया कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी घेतली आहे. वर्व आणि इंडियन क्वार्टरलीच्या त्या मुख्य संपादक आहेत. त्यांच्या दोन्ही मुली अलिका आणि दिव्या चित्रपट आणि डिझाइन क्षेत्रात नाव कमावत आहेत. त्याचबरोबर त्या आपल्या आईला व्यवसायातही मदत करत आहेत. त्यांच्या मुलींना महिंद्रा यांच्या व्यवसायात फारसा रस नाही. आनंद महिंद्रा यांनी आपण आपल्या मुलींना हवं ते करण्यापासून रोखत नाही असं म्हटलं होतं
टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राbusinessव्यवसाय