anand rathi bets on these five stocks include airtel for up to 30 per cent upside
हीच ती वेळ! 'हे' ५ शेअर्स करून देणार बंपर कमाई; ६ महिन्यांत ३० टक्क्यांपर्यंत रिटर्न By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 9:40 PM1 / 8युक्रेन-रशिया युद्धाचा थेट परिणाम शेअर बाजारावर होताना दिसत आहे. आज सेन्सेक्स १९०० हून अधिक अंकांनी कोसळला. तर निफ्टीत ५०० पेक्षा जास्त अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणुकदारांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं.2 / 8शेअर बाजारात पडझड सुरू असताना गु्ंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. त्या दृष्टीकोनातून पाहिल्यास सध्याची परिस्थिती गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. योग्य शेअर्समध्ये पैसे गुंतवल्यास उत्तम परतावा मिळू शकतो.3 / 8शेअर बाजारात मोठी पडझड होत असताना ब्रोकरेज फर्म आनंद राठीनं गुंतवणुकीसाठी काही शेअर्सची निवड केली. पुढील ३ ते ६ महिन्यांत या शेअर्सची किंमत ३० टक्क्यांनी वाढू शकेल असा अंदाज आहे. तुम्ही तुमच्या गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन यामध्ये गुंतवणूक करू शकता.4 / 8भारती एअरटेल- सध्या या शेअरची किंमत ६७७.२० रुपये आहे. ती ८०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. या शेअरचा स्टॉप लॉस ५७० रुपये आहे.5 / 8ब्रिटानिया- ब्रिटानियाच्या स्टॉकमध्ये पुढील काही महिन्यांत तेजी पाहायला मिळू शकते. सध्या या शेअरची किंमत ३१०० ते ३२०० रुपयांदरम्यान आहे. पुढल्या ६ महिन्यांत ती ३९०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.6 / 8आयशर मोटर्स- जानेवारी २०२१ पासून आयशर मोटर्सच्या शेअरची किंमत २२०० ते ३००० रुपयांच्या दरम्यान राहिली आहे. गेल्या काही दिवसांत शेअर घसरला आहे. सध्या त्याचा दर २,२६३ रुपये आहे. तो २,८०० रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.7 / 8आयसीआयसीआय बँक- या शेअरची सध्याची किंमत ६५३.५ रुपये आहे. पुढील ६ महिन्यांत शेअरची किंमत ८०० रुपयांपर्यंत जाऊ शकते.8 / 8मारुती सुझूकी- जानेवारी २०२१ पासून या शेअरची किमत ६५०० ते ९००० रुपयांच्या दरम्यान राहिली आहे. गेल्या काही दिवसांत शेअर घसरला आहे. पुढील ६ महिन्यांत शेअरची किंमत ८,५०० रुपयांवर जाऊ शकते. सध्या ती ६,७७२.९० रुपये आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications