शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Apple Store in India: ना नारळ फोडलं ना लाल रिबीन कापली; असं झालं Apple च्या पहिल्या स्टोअरचं उद्घाटन...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 1:37 PM

1 / 9
Apple ने भारतात आपले पहिले अधिकृत Apple Store लॉन्च केले आहे. कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी मुंबईत Apple BKC स्टोअरचे उद्घाटन केले. उद्घाटन करताना लाल रिबन कापली गेली नाही किंवा नारळही फोडला गेला नाही. कुक यांनी थेट अॅपल स्टोअरचा दरवाजा उघडून स्टोअरचे उद्घाटन केले. Apple ने भारतात 25 वर्षांनंतर पहिले स्टोअर सुरू केले आहे.
2 / 9
हे Apple Store इतर सर्व स्मार्टफोन स्टोअर्सपेक्षा खूप वेगळे आहे. भारतीय संस्कृती लक्षात घेऊन हे स्टोअर तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये विविध राज्यांतील कलाकृती पाहता येतील. स्टोअरच्या छतावर 1,000 टाइल्स लावण्यात आल्या असून, यातील प्रत्येक टाइल 408 लाकडापासून बनवलेली आहे. स्टोअरच्या कामकाजासाठी सौरऊर्जेचा वापर करण्यात आला आहे. अशा प्रकारे स्टोअर पूर्णपणे कार्बन न्यूट्रल आहे. हे दुकान 100% अक्षय ऊर्जेवर चालते.
3 / 9
भारत हा जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन बाजारांपैकी एक आहे. त्यामुळे अॅपललाही एवढी मोठी बाजारपेठ हाताबाहेर जाऊ द्यायची नाही. Apple Store लॉन्च केल्यामुळे कंपनीला भारतीय ग्राहकांशी थेट कनेक्ट होण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अॅपलच्या उत्कृष्ट सेवेचा लाभही ग्राहकांना घेता येणार आहे. मुंबईनंतर दिल्लीतील साकेतमध्ये दुसरे अॅपल स्टोअर 20 एप्रिलला सुरू होणार आहे.
4 / 9
25 देशांमध्ये 552 ऍपल स्टोअर्स - लॉन्च होण्यापूर्वीच मुंबईतील ऍपल स्टोअरमध्ये मोठी गर्दी जमली होती. हे सर्व लोक भारतातील पहिल्या अॅपल स्टोअरच्या उद्घाटनाचे साक्षीदार होण्यासाठी जमले. मुंबईतील अॅपल बीकेसी आणि दिल्लीतील अॅपल साकेत नंतर, अॅपल स्टोअरची एकूण संख्या 552 पर्यंत पोहोचेल. जगभरात कंपनीचे 25 देशांमध्ये Apple स्टोअर्स आहेत.
5 / 9
मुंबईतील अॅपल स्टोअरचा पत्ता सांगायचा झाला, तर हे जिओ वर्ल्ड ड्राइव्ह वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. कंपनीने त्याची वेळही जाहीर केली आहे. अॅपल स्टोअर सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. आठवड्याचे सातही दिवस तुम्ही येथील सेवेचा लाभ घेऊ शकता. स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीकडून चांगले प्रशिक्षण देण्यात आले आहे.
6 / 9
Apple Store BKC मध्ये 100 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, जे 20 पेक्षा जास्त भाषा बोलू शकतात. मुंबईतील अॅपल स्टोअर जगाच्या कानाकोपऱ्यातील ग्राहकांचे स्वागत करते. येथे त्यांना सर्वोत्तम उत्पादने आणि सेवांचे तपशील दिले जातील. अॅपल ट्रेड इन प्रोग्रामची सुविधा देखील स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.
7 / 9
अॅपल बीकेसी स्टोअरमध्ये भारतीय ग्राहकांना कंपनीच्या AI सेवा 'Apple Genius' शी संवाद साधता येणार आहे. ही सुविधा परदेशात अॅपल स्टोअरमध्ये ऑफर केलेल्या सुविधांसारखीच आहे.
8 / 9
अॅपलच्या जिनियसमधून ग्राहकांना कंपनीच्या कोणत्याही उत्पादनाची माहिती मिळू शकते. ग्राहक नवीन आयफोन आणि कंपनीचे इतर उत्पादने खरेदी करू शकतात. तसेच, खरेदीदार त्यांचे जुने आयफोन, मॅक, आयपॅड एक्सचेंज करू शकतात.
9 / 9
कंपनीच्या या अधिकृत अॅपल स्टोअरमुळे ग्राहकांना चांगली सेवा मिळणार आहे. यामुळे तुम्हाला कंपनीचे ओरिजीनल प्रोडक्ट्स एकाच छताखाली मिळतील.
टॅग्स :Apple IncअॅपलMumbaiमुंबईtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल