apple store in india employees salary and qualification
Apple स्टोअरमध्ये काम करणारे साधेसुधे सेल्समन नाहीएत; पगार पाहूनच डोळे पांढरे कराल, शिक्षण तर दूरच... By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 9:43 AM1 / 11Apple आता भारतात दोन स्टोअर सुरू केले आहेत. मुंबई आणि दिल्ली या शहरात स्टोअर सुरू केले आहेत.या स्टोअरमध्ये काम करणारे कर्मचारी साधेसुधे नाहीत. त्यांचे शिक्षण आणि पगारही खास आहे. 2 / 11Apple च्या दोन्ही स्टोअर्सच्या उद्घाटनासाठी कंपनीचे स्वतः सीईओ टीम कुक भारतात आले होते. हाय प्रोफाईल स्टोअरचे भव्य उद्घाटन झाले. यासह अॅपलने भारतात प्रथमच दोन फ्लॅगशिप स्टोअर उघडले.3 / 11या स्टोअरमध्ये काम करणारे कर्मचारी देखील खूप खास आहेत. या स्टोअरचे भाडे महिन्याला ४२ लाख आहे, मग त्या स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार किती असेल? असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. 4 / 11Apple च्या दोन्ही स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी उच्चशिक्षित आहेत. त्यांचा पगारही खूप खास आहे. हे दोन स्टोअर हाताळण्यासाठी १७० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा स्टाफ खूप खास आहे.5 / 11Apple स्टोअरमध्ये काम करणाऱ्या स्टाफ जवळ हाय प्रोफाईल डिग्री आहेत. काही कर्मचारी केंब्रिज आणि ग्रिफिथसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमधून आले आहेत. Apple स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे एमटेक, एमबीए, बीटेक, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, पॅकेजिंग, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंजिनिअरिंग यासारख्या पदव्या आहेत.6 / 11Apple च्या स्टोअरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांचा पगार सामान्य इलेक्ट्रॉनिक स्टोअरमध्ये काम करणार्या सामानाच्या ३ ते ४ पट आहे. अशी उच्च पात्रता असलेले अनेकजण रिटेल स्टोअरमध्ये नोकरी करत आहेत, त्यामुळे त्यांचा पगारही विशेष असेल हे उघड आहे. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा एक लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे.7 / 11Apple हा जागतिक ब्रँड आहे, त्यामुळे तो आपल्या कर्मचाऱ्यांना विशेष सुविधाही देतो. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य लाभ, वैद्यकीय योजना, पगारी रजा, शैक्षणिक अभ्यासक्रमांचे शिक्षण शुल्क आदी सुविधा मिळतात. त्याचबरोबर अॅपलची उत्पादने खरेदी करण्यावरही सूट देण्यात आली आहे.8 / 11मुंबई आणि दिल्ली येथे असलेल्या Apple स्टोअरमध्ये काम करणारे कर्मचारी अतिशय खास आहेत. मुंबईतील स्टोअरचे स्टार्स २५ भाषा बोलतात, तर दिल्ली स्टोअरचे कर्मचारी १८ भाषा बोलतात.9 / 11मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील अॅपल स्टोअर दिल्लीतील स्टोअरपेक्षा मोठे आहे. दिल्लीतील स्टोअरच्या तुलनेत येथील कर्मचाऱ्यांची संख्याही अधिक आहे. अॅपल स्टोअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवडही सोपी नव्हती. अनेक फेऱ्या पार केल्यानंतर त्यांची निवड झाली.10 / 11Apple स्टोअरमध्ये काम एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,त्यांना Apple स्टोअरमध्ये नोकरी कशी मिळाली. त्यांनी सांगितले की त्यांनी कंपनीच्या वेबसाईटवर अगोदर आपला रिझ्युम सादर केला होता. यानंतर त्यांना मुलाखतीसाठी फोन आला. त्यांचा कामाचा अनुभव आणि गॅजेट्सचे ज्ञान या मुलाखतीत कामी आला. त्यांनी सांगितले की Apple स्टोअरमध्ये काम करणे हा पूर्णपणे वेगळा अनुभव आहे, असंही त्यांनी सांगितले.11 / 11Apple स्टोअरच्या कर्मचाऱ्यांना सॅलरीच मोठी नाही तर त्यांचे भाडेही खास आहे. मुंबईतील स्टोअरचे भाडे ४२ लाख रुपये प्रति महिना तर दिल्लीतील ४० लाख रुपये प्रति महिना आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications