शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोबाइलनुसार Ola, Uber करतं भाड्यात गोलमाल? कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, "आम्ही ऑपरेटिंग सिस्टमच्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 10:51 IST

1 / 6
Ola Uber Taxi Charges : गेल्या काही दिवसांपासून ओला उबर हे चर्चेचा विषय ठरत आहेत. ओला आणि उबर हे मोबाइलच्या डिव्हाईसनुसार म्हणजेच अॅपल आणि अँड्रॉईडनुसार वेगवेगळी भाडी आकारत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ओला उबरला सरकारनं नोटीस बजावली होती.भारत सरकारनं या देशातील प्रमुख कॅब एग्रीगेटरकडून यासंदर्भात उत्तरं मागितली होती.
2 / 6
दरम्यान, यानंतर कंपन्यांनी स्पष्टीकरण दिलंय. ऑनलाइन कॅब बुकिंग सेवा देणाऱ्या ओला आणि उबरच्या म्हणण्यानुसार ते प्रत्येक मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमवर समान प्राईज स्ट्रक्चरचं पालन करत आहेत. अँड्रॉइड किंवा आयओएसच्या आधारे किंमतीत फरक केला जात नाही.
3 / 6
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) ओला आणि उबर या कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांना किमतींबाबतच्या तक्रारींनंतर नोटीस बजावली होती. ओला आणि उबरविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांची अॅप्स आयफोन आणि अँड्रॉइड मोबाइल वापरकर्त्यांसाठी एकाच डेस्टिनेशनसाठी निरनिराळी भाडी आकारत असल्याचं सांगण्यात आलं होतं.
4 / 6
ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रथमदर्शनी किंमतीतील तफावत ही अयोग्य ट्रेड प्रॅक्टिस आणि ग्राहकांच्या हक्कांचं उल्लंघन असल्याचं म्हटलं होतं. या आरोपांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी सीसीपीएला दिले होते.
5 / 6
आमच्याकडे आमच्या सर्व ग्राहकांमध्ये एकसमान प्राइसिंग स्ट्रक्चर आहे आणि समान राइडसाठी युझर्सच्या मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमच्या आधारावर फरक करत नाही. कोणत्याही गैरसमजाचे निराकरण करण्यासाठी सीसीपीएसोबत जवळून काम करणार असल्याची प्रतिक्रिया ओलाच्या प्रवक्त्यांनी दिली.
6 / 6
उबरलाही सीसीपीएकडून एक नोटीस मिळाली होती आणि त्यावरही कंपनीकडून उत्तर देण्यात आलं. 'आम्ही रायडरच्या फोन कंपनीनुसार प्राईज सेट करत नाही, कोणत्याही प्रकारचे गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही सीसीपीएसोबत काम करण्यास तयार आहोत,' असं कंपनीनं म्हटलंय.
टॅग्स :OlaओलाUberउबर