शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतीयांचा डंका; मायक्रोसॉफ्ट, गुगलपाठोपाठ आयबीएमच्या प्रमुखपदीही भारतीय व्यक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 11:13 PM

1 / 7
गेल्याच आठवड्यात अरविंद कृष्णा यांची आयबीएमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली. ५७ वर्षांचे कृष्णा ६ एप्रिलपासून पदभार स्वीकारतील.
2 / 7
चेन्नईत जन्मलेले सुंदर पिचाई सध्या गुगलचे सीईओ आहेत. ऑगस्ट २०१५ पासून ते गुगलचं नेतृत्व करत आहेत. त्याआधी त्यांनी गुगल टूलबार आणि गुगल क्रोमवर काम केलं आहे.
3 / 7
सत्या नडेला १९९२ पासून मायक्रोसॉफ्टमध्ये कार्यरत आहेत. फेब्रुवारी २०१४ पासून ते मायक्रोसॉफ्टचे सीईओ म्हणून काम करत आहेत. बिल गेट्स, स्टीव्ह बाल्मेर यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टची धुरा नडेला यांच्याकडे सोपवण्यात आली.
4 / 7
हैदराबादमध्ये जन्मलेले शंतनू नारायण १९९८ पासून अ‍ॅडोबमध्ये काम करत आहेत. २००५ मध्ये त्यांच्याकडे सीओओ पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतर दोनच वर्षात त्यांची सीईओपदी नियुक्ती झाली.
5 / 7
अजयपाल सिंग बग्गा २०१० पासून मास्टरकार्डचे सीईओ म्हणून काम करत आहेत. त्याआधी ते सिटी ग्रुप आशिया पॅसिफिकचे सीईओ होते. त्यांनी नेसले आणि पेप्सिकोतही वरिष्ठ पदांवर काम केलं आहे.
6 / 7
दिल्लीत जन्मलेले राजीव सुरी मे २०१४ पासून नोकियाच्या सीईओपदी आहेत. त्याआधी ते नोकिया सोल्युशन्सचे सीईओ होते. त्यांनी नोकियामध्ये विविध पदांवर काम केलं आहे.
7 / 7
फ्रान्सिस्को डिसुझा यांनी २००७ मध्ये कॉग्निझंटच्या सीईओ पदाची सूत्रं स्वीकारली. त्यावेळी कंपनीचं महसुली उत्पन्न २.१ बिलियन अमेरिकन डॉलर होतं. २०१८ मध्ये ते १६.१ मिलियन अमेरिकन डॉलरवर पोहोचलं.
टॅग्स :googleगुगलSundar Pichaiसुंदर पिचई