शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Aryan Khan Drug Case: 2 ऑक्टोबरची तारीख! शाहरुखलाच नाही तर IRCTC लाही मोठा झटका देऊन गेली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:02 AM

1 / 10
कार्डेलिया क्रूझवर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने रेड टाकून ड्रग्ज प्रकरणी पकडले. हा दिवस आजवर कोणत्याही वादात न पडलेल्या शाहरुख खानला मोठा झटका देणारा ठरला. याचबरोबर तो आयआरसीटीसीला देखील मोठा झटका देऊन गेला आहे.
2 / 10
इंडियन रेल्वे टूरिझम अँड कॅटरिंग कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने उत्पन्न वाढविण्यासाठी कार्डेलिया नावाच्या क्रूझ लायनरसोबत करार केलेला होता. मुंबईसह विविध राज्यांच्या समुद्रातून, बंदरांमधून पर्यटन करणाऱ्या या क्रूझद्वारे आयआरसीटीसीला उत्पन्न वाढण्याची अपेक्षा होती.
3 / 10
दिवाळीच्या सुट्या, ख्रिसमस आदी येत असल्याने गेल्या दोन वर्षांतील ही मोठी संधी होती. या क्रूझवर येण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर बुकिंग करतील अशी अपेक्षा होता. मात्र, दोन ऑक्टोबरला झालेल्या रेव्ह पार्टीच्या घटनेमुळे जोरदार फटका बुकिंगवर पडला आहे.
4 / 10
आयआरसीटीसीने कार्डिलियाची एकही सीट बुक केलेली नाही. सध्या तरी आयआयसीटीसी वाट पाहण्याच्या भूमिकेत आहे.
5 / 10
आयआरसीटीसीने या प्रमियम क्रूझ लायनरसाठी सप्टेंबरपासून पहिल्यांदाच तिकिट बुकिंग सुरु केली होती. IRCTC च्या दिल्लीतील अधिकाऱ्याने सांगितले की, सप्टेंबरसाठी देशभरातून जवळपास 260 तिकिटे बुक झाली होती. मात्र, ऑक्टोबरसाठी एकही तिकिट बुक झाले नाही.
6 / 10
बुकिंगसाठी चौकशी मोठ्या प्रमाणावर होत आहे. लोक दिवाळी, ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी सुट्ट्यांची मजा घेण्याची योजना बनवत आहेत.
7 / 10
आयआरसीटीसी अनुसार सप्टेंबरमध्ये ज्या लोकांनी क्रूझ बुक केली होती, त्यापैकी 20 प्रवाशांनी डिसेंबरमध्ये देखील केरळसाठी तिकिट बुक केले आहे. जरी आमच्या वेबसाईटवरून बुकिंग झालेली असली तरी या परिस्थितीत सर्वस्वी जबाबदारी ही त्या प्रवाशांचीच राहणार आहे.
8 / 10
आयआरसीटीसीने सप्टेंबरमध्ये ज्या बुकिंग घेतलेल्या ती ट्रिप 18 सप्टेंबरला निघाली होती. परदेशी कंपनीने करार केल्यापासून प्रवासी आयआरसीटीसीकडे विचारणा करत आहेत. या क्रूझवर 2000 प्रवाशांची सोय आहे. गोवा, दीव, लक्षद्वीप, कोच्ची आणि श्रीलंकेसाठी बुकिंग सुरु असते.
9 / 10
एनसीबीकडून कार्डेलियावर छापेमारी करण्यात आली होती. एका खासगी पार्टीने ही क्रूझ बुक केली होती. मात्र, एनसीबीच्या छापेमारीनंतर आयआरसीटीसी सावध झाली आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या या क्रूझवर ड्रग पार्टी केल्याने आयआरसीटीसीने करारावर पुनर्विचार केला आहे.
10 / 10
मात्र, कोरोनानंतर दिवाळी आणि ख्रिसमसमुळे लोकांमध्ये उत्साह होता, त्यामुळे मोठी बुकिंग मिळेल अशी अपेक्षा आयआरसीटीसीला होती. मोठा महसूल मिळणार होता. परंतू त्या अपेक्षांवर पाणी फिरले आहे.