शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुंतवणूकदारांची चांदी! 1001 कोटी रुपयांची ऑर्डर मिळताच शेअरनं घेतली भरारी; 1 महिन्यात दिला 54% चा परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 5:26 PM

1 / 7
सिव्हिल कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीशी संबंधित कंपनी आयटीडी सिमेंटेशनच्या शेअरने सध्या रॉकेट स्पीड घेतला आहे. कंपनीचा शेअर शुक्रवारी 13 टक्क्यांच्या तेजीसह 305 रुपयांवर पोहोचला आहे.
2 / 7
आयटीडी सिमेंटेशनचा शेअर शुक्रवारी 52 आठवड्यांतील आपला उच्चांकावर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ही तेजी 1001 कोटी रुपयांची नवी ऑर्डर मिळाल्यानंतर आली आहे. आयटीडी सिमेंटेशनच्या शेअरने गेल्या एका महिन्यात तब्बल 54 टक्क्यांची उसळी घेतली आहे.
3 / 7
या राज्यात मिळालाय मोठा कॉन्ट्रॅक्ट - आयटीडी सिमेंटेशनने एक्सचेन्ज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तिला 500 मेगावॅट हायडेल पॉवर, पंप्ड स्टोरेज प्रोजेक्टसाठी सिव्हिल आणि हायड्रो मॅकेनिकल वर्क्ससाठी कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. हा प्रोजेक्ट आंध्र प्रदेशात आहे. या कॉन्ट्रॅक्टचे मूल्य 1001 कोटी रुपये एवढे आहे.
4 / 7
आयटीडी सिमेंटेशनला यापूर्वी 10 ऑगस्टला ट्रान्सरेल लायटिंगसह ज्वॉइंट व्हेंचरमध्ये बांगलादेशात एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत आयटीडी सिमेंटेशनची कंसॉलिडेटेड ऑर्डर बुकिंग 22080 कोटी रुपयांची होती.
5 / 7
इस साल अब तक शेयरों में 125% का उछाल आयटीडी सिमेंटेशनच्या शेअरने या वर्षात आतापर्यंत 125 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. कंपनीचा शेअर वर्षाच्या सुरवातीला अर्थात 2 जानेवारी 2023 रोजी 126.45 रुपयांवर होता. तो 1 डिसेंबर 2023 रोजी 305 रुपयांवर पोहोचला आहे.
6 / 7
तसे गेल्या 8 महिन्यांच्या कालावधीत आयटीडी सिमेंटेशनच्या शेअरमध्ये 190 टक्क्यांची तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 28 मार्च 2023 रोजी 97.31 रुपयांवर होता. तो 1 डिसेंबर 2023 रोजी 305 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील नीचांक 93.75 रुपये एवढा आहे.
7 / 7
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
टॅग्स :share marketशेअर बाजारStock Marketशेअर बाजारInvestmentगुंतवणूक