asian paints going to increase its employees salary despite coronavirus crisis kkg
CoronaVirus News: देशीतील 'ही' कंपनी प्रवाहाविरोधात पोहणार; कोरोना संकटातही पगारवाढ करणार By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 5:15 PM1 / 11कोरोनामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला धक्का बसला असून कोट्यवधी रोजगार संकटात आले आहेत. त्यामुळे अनेकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.2 / 11कोरोनामुळे जगभरातल्या उद्योगधंद्यांवर परिणाम झाला असून कामगार कपात, वेतन कपात सुरू झाली आहे.3 / 11कोरोनामुळे उबरनं साडे तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याचा निर्णय कालच घेतला. अवघ्या ३ मिनिटांच्या कॉलमध्ये कंपनीनं कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करत असल्याची माहिती दिली.4 / 11संपूर्ण जगातून कर्मचारी कपात, वेतन कपातीची चर्चा ऐकू येत असताना एका कंपनीनं कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही कंपनी भारतीय आहे.5 / 11एशियन पेंट्स कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार आहे. कर्मचाऱ्यांचं मनोबल उंचावण्यासाठी कंपनीनं पगार वाढ करण्याचा निर्णय घेतला. 6 / 11विक्री प्रक्रियेत महत्त्वाची प्रक्रिया बजावणाऱ्या कंत्राटदारांच्या खात्यातही ४० कोटी जमा करण्याचा निर्णय एशियन पेंट्सनं घेतला आहे.7 / 11कोरोना संकटाच्या काळात आम्ही आदर्श नेतृत्त्वाचं उदाहरण समोर ठेवू इच्छितो, असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित शिंगळे यांनी सांगितलं. 8 / 11अवघड काळात एक संस्था म्हणून आम्ही कर्मचारी आणि कंपनीशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकासोबत आहोत, हा संदेश देण्यासाठी पगार वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं अमित शिंगळे म्हणाले.9 / 11नफ्यात असताना कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवायचं आणि तोट्यात असताना त्यांना नोकरीवर काढायचं, या सिद्धांतावर आम्ही करत नाही. संकटाच्या काळातही आम्ही कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभे आहोत, असं व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितलं.10 / 11याआधी एशियन पेंट्सनं राज्य आणि केंद्राला कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ३५ कोटी रुपये दान केले आहेत. 11 / 11कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशाला मदत करण्यासाठी एशियन पेंट्स सॅनिटायझरची निर्मिती करत आहे. विरोप्रोटेक्ट नावानं कंपनीनं आपलं उत्पादन बाजारात आणलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications