शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Asia’s Richest Village : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव; बँकांमध्ये ७,००० कोटींची FD, डॉलरमध्ये येतो पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 11:20 IST

1 / 7
तुम्हाला देशातील सर्वात श्रीमंत लोकांची नावे नक्कीच माहिती असतील. उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांची नावे यात पहिली येतात. पणआशिया खंडातील सर्वात श्रीमंत गाव माहिती आहे का? ९९ टक्के लोकांना याचं उत्तर येत नाही. गुजरातमधील भुजमधील माधापूर या छोट्याशा गावाला आशियातील सर्वात श्रीमंत गाव म्हटले जाते.
2 / 7
या गावाची लोकसंख्या केवळ ३२,००० आहे. पण, येथे ७,००० कोटींहून अधिक मुदत ठेवी आहेत. या विक्रमाला भारत सरकारनेही मान्यता दिली आहे.
3 / 7
माधापूरच्या श्रीमंतीचे रहस्य तेथील अनिवासी भारतीय (NRI) समुदायामध्ये आहे, जे गावाच्या लोकसंख्येच्या ६५% आहेत. हे अनिवासी भारतीय प्रामुख्याने आफ्रिका, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले आहेत. तेथूनच त्यांच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा येतो.
4 / 7
माधापूरमध्ये पैसा फक्त बँक खात्यांमध्ये पडून नाही. या पैशातून गाव विकासाचे मॉडेल बनले आहे. येथे चांगले रस्ते, तलाव, शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, मंदिरे बांधली आहेत.
5 / 7
अनिवासी भारतीयांच्या गुंतवणुकीमुळे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँकांचे लक्ष वेधून घेणारे माधापूर हे आर्थिक केंद्र बनले आहे. सध्या येथे १७ बँका आहेत. यामध्ये SBI, HDFC, ICICI, PNB आणि इतर अनेकांचा समावेश आहे.
6 / 7
माधापूरचे गावकरी आज दगभरात स्थायिक झाले आहेत. मात्र, अद्यापही त्यांची गावाची नाळ तुटलेली नाही. ते फक्त कुटुंसाठी नाही तर गावाच्या विकासासाठी भरपूर पैसे खर्च करतात.
7 / 7
जगभर पसरलेले गावकरी माधापूरच्या विकासासाठी पैसे देतात जेणेकरून गाव आणि तेथील लोक एकत्र प्रगती करू शकतील. आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथली बहुतांश संपत्ती आफ्रिकेत बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या अनिवासी भारतीयांकडून येते. त्यांनी पाठवलेला पैसा गावाच्या अर्थव्यवस्थेला सतत हातभार लावत असतो.
टॅग्स :GujaratगुजरातMONEYपैसाInvestmentगुंतवणूक