शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एकेकाळी शाळेची फी भरायलाही नव्हते पैसे, वडील करायचे मजुरी; आज आहेत कोट्यवधींचे मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 10:48 AM

1 / 8
प्रामाणिकपणे कठोर परिश्रम केलं तर मोठे यश नक्कीच मिळू शकतं. गुजरातमधील अहमदाबाद येथील रहिवासी जयंती कनानी यांनीही असंच केलं आहे. जयंती कनानी यांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. एक काळ असा होता की त्यांच्याकडे शाळेची फी भरायलाही पैसे नव्हते.
2 / 8
त्याचे कुटुंब अहमदाबाद शहराच्या बाहेर असलेल्या एका परिसरातील छोट्या फ्लॅटमध्ये राहत होते. जयंती यांचे वडील हिऱ्याच्या कारखान्यात काम करायचे. कनानी यांनी कसंबसं कम्प्युटर सायन्समध्ये बी.टेकचं शिक्षण पूर्ण केलं. घरची परिस्थिती अशी नव्हती की तो पुढे शिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे त्यांनी शिक्षण पूर्ण होताच कामाला सुरुवात केली.
3 / 8
जयंती कनानी यांना पहिल्या नोकरीत फक्त ६,००० रुपये पगार मिळाला. याच कालावधीत त्यांच्या वडिलांची दृष्टी खूपच कमकुवत झाली होती. जयंती कनानी यांनी त्यांना आपलं काम सोडण्यास सांगितलं. वडील काम करत नसल्यामुळे सर्व जबाबदारी जयंती कानानी यांच्यावर पडली.
4 / 8
यानंतर त्यांनी आपली नोकरी बदलली आणि दुसरीकडे काम करू लागले. तसंच अतिरिक्त उत्पन्नासाठी ते नोकरीनंतरही घरीच काही प्रोजेक्ट्सवर काम करत होते. त्यामुळे घरची परिस्थिती थोडी ठीक झाली. पण, जयंती कनानी यांना खूप मेहनत करावी लागत होती.
5 / 8
जयंती यांना जास्त पगाराची नोकरी शोधावी लागली. ते एका स्टार्टअपमध्ये सहभागी झाले. त्यांनी अनेक पार्टटाईम प्रोजेक्ट केले. लग्नासाठी त्यांना कर्जही घ्यावं लागलं. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या जयंती यांच्या मनात बिलियन डॉलर्सची कंपनी उभारण्याचा विचारही कधी आला नव्हता. जयंती कनानी एका कंपनीत डेटा एनालिस्ट म्हणून काम करत असताना त्यांची संदीप नेलवाल आणि अनुराग अर्जुन यांच्याशी भेट झाली. तिघांनाही पैसे कमावण्यासाठी काहीतरी मोठं करायचं होतं.
6 / 8
२०१७ मध्ये, जयंती यांनी नेलवाल आणि तिसरे सह-संस्थापक अनुराग अर्जुन यांच्यासोबत पॉलिगॉन नावाची कंपनी स्थापन केली. त्यांचे चौथे सह-संस्थापक, सर्बियन टेक्नोक्रॅट मिहालिओ बेजेलिक नंतर संचालक मंडळात सामील झाले.
7 / 8
कंपनी तेव्हा प्रसिद्धीझोतात आली जेव्हा त्यांना अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध गुंतवणूकदारांपैकी एक आणि शार्क टँक जज मार्क क्यूबन यांच्याकडून गुंतवणूक मिळाली. २०२२ मध्ये पॉलिगॉननं सॉफ्टबँक, टायगर ग्लोबल, सिकोइया कॅपिट इंडिया सारख्या गुंतवणूकदारांकडून ४५० मिलियन डॉलर्सचा निधी उभारला. आज ही कंपनी हजारो कोटी डॉलर्सची आहे.
8 / 8
पॉलिगॉन प्लॅटफॉर्मच्या मदतीने इथरियम स्केलिंग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सहज करता येतात. युझर्स त्याच्या मदतीनं अॅप्स देखील तयार करू शकतात. पॉलिगॉनच्या ब्लॉकचेनचा गेमिंग प्लेयर्स, नॉन-फंजिबल टोकन्स आणि डिसेंट्रलाइज्ड फायनान्समध्ये काम तेजीनं वाढत आहे.
टॅग्स :businessव्यवसायInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी