शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Atal Pension Scheme: सुपरहिट 'सरकारी' योजना; दररोज 7 रुपये वाचवा अन् 60 हजार पेंशन मिळवा, Tax मध्येही सूट..

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 3:59 PM

1 / 7
Atal Pension Yojana: म्हातारपणी पैशांची अडचण येऊ नये, अशी सर्वांचीच इच्छा असते. तुम्हालाही तुमचे म्हातारपण सुरक्षित करायचे असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आम्ही तुम्हाला अशा सरकारी योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात गुंतवणूक करुन तुम्ही महिन्याला चांगली पेंशन मिळवू शकता.
2 / 7
आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अटल पेंशन योजने (Atal Pension Yojana- APY) बद्दल सांगणार आहोत. अटल पेंशन योजना साल 2015 मध्ये सुरू झाली होती. सुरुवातीला ही योजना असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी होती, पण आता कोणताही व्यक्ती या योजनेत पैसे गुंतवू शकतो.
3 / 7
या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक आणि तुमचे वय 18 ते 40 दरम्यान पाहिजे. या योजनेत 60 वर्षानंतर गुंतवणूकदाराला पेंशन मिळणे सुरू होते. या योजनेत तुम्हाला कमीत कमी 1,000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये आणि जास्तीत जास्त 5,000 रुपये मासिक पेंशन मिळू शकते.
4 / 7
या सरकारी योजनेत तुमची गुंतवणूक एकदम सुरक्षित राहते. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर रजिस्ट्रेशन करू शकता. यासाठी तुमच्याकडे सेविंग्स अकाउंट, आधार नंबर आणि एक मोबाइल नंबर असणे गरजेचे आहे. जितक्या लवकर तुम्ही गुंतवणूक सुरू कराल, तेवढा मोठा फायदा होईल.
5 / 7
जर एखादा व्यक्ती 18 व्या वर्षी अटल पेंशन योजनेत गुंतवणूक सुरू करतो, तर त्याला 60 वर्षे झाल्यानंतर दर महिन्याला 5000 रुपये मासिक पेंशन मिळू शकते. यासाठी त्याला महिन्याला फक्त 210 रुपये जमा करावे लागतात. म्हणजेच तुम्हाला दररोज फक्त 7 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
6 / 7
याच क्रमाणे तुम्ही दर महिन्याला 42 रुपये जमा केले, तर 1000 रुपये मासिक पेंशन मिळेल. तसेच, 2000 रुपये पेंशन मिळवण्यासाठी तुम्हाला 84 रुपये भरावे लागतील. याच क्रमाणे 3000 रुपये पेंशनसाठी 126 रुपये आणि 4000 रुपये मासिक पेंशनसाठी 168 रुपये जमा करावे लागतील.
7 / 7
या योजनेची खासियत म्हणजे, या योजनेत गुंतवणूकदाराला इनकम टॅक्स अॅक्ट 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळतो. यातून टॅक्सेबल इनकम कमी केली जाते. याशिवाय, काही प्रकरणामध्ये 50,000 रुपयापर्यंत एक्स्ट्रा टॅक्स बेनिफिट मिळतो. या योजनेत 2 लाख रुपयांपर्यंतचे डिडक्शन मिळतात.
टॅग्स :Investmentगुंतवणूकbusinessव्यवसाय