शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ATM Card Insurance: ATM वर तुम्हाला फ्री मिळतो ५ लाखांचा इन्शुरन्स; पण क्लेम कसा करायचा? सारेच अज्ञात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 1:16 PM

1 / 10
आजच्या काळात एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त एटीएम कार्ड असतात. या एटीएम कार्डांवर तुम्हाला फुकटात पाच लाखांपर्यंतचा अपघाती विमा मिळतो. परंतू, त्यावर कोणी क्लेमच करत नाही. बँकाही ग्राहकांना याची माहिती देत नाहीत. परंतू, अडचणीच्या वेळी तुम्हाला हाच इन्शुरन्स मदतीला येऊ शकतो. तो क्लेम कसा करायचा...
2 / 10
एटीएम कार्ड कोणतेही असो, त्यावर तुम्हाला पन्नास हजारापासून पाच लाखांपर्यंतचा विमा असतो. हा विमा मिळविण्यासाठी बँकांचे काही नियम असतात.
3 / 10
महिन्यातून दोनदा त्या एटीएम कार्डावरून ट्रान्झेक्शन होणे, बँक अकाऊंटला नॉमिनी असणे आदी ते नियम आहेत. त्याबाबत तुम्ही तुमच्या बँकेकडून माहिती घ्यावी. परंतू एटीएम कार्डांचे काही प्रकार असतात, त्यानुसार ही विम्याची रक्कम बदलत जाते.
4 / 10
बँका तुमच्याकडून एटीएम चार्जेस आकारतात तसेच त्याचे फायदे पण असतात. बँक जेव्हा तुम्हाला एटीएम कार्ड देते तेव्हा त्यासोबत अपघाती विमा (ATM Card Accidental Insurance) आणि लाईफ इन्शुरन्स (ATM Card Life Insurance) देत असते. मात्र, फार कमी लोक त्याद्वारे क्लेम करतात. याचे मोठे कारण म्हणजे आपल्याला माहितीच नसते. गावाकडील लोकांचे सोडा शहरातील लोकांनाही याची कल्पना नसते.
5 / 10
जर एखादी व्यक्ती कोणत्याही राष्ट्रीयकृत आणि गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचे एटीएम किमान ४५ दिवस वापरत असेल, तर तो एटीएम कार्डसोबत येणाऱ्या विम्याचा दावा करण्यास पात्र ठरतो. बँका ग्राहकांना विविध प्रकारचे एटीएम कार्ड देतात. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार त्याच्यासोबत येणारी विम्याची रक्कम ठरवली जाते.
6 / 10
ग्राहकांना क्लासिक कार्डवर 1 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर 2 लाख रुपये, नॉर्मल मास्टर कार्डवर 50,000 रुपये, प्लॅटिनम मास्टर कार्डवर 5 लाख रुपये असा विमा दिला जातो. व्हिसा कार्डवर 1.5-02 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध आहे.
7 / 10
प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत, ग्राहकांना रुपे कार्ड दिले जाते. यावर 01 ते 02 लाख रुपयांपर्यंतचा विमा मिळतो.
8 / 10
जर एटीएम कार्डधारकाचा अपघात झाला व त्यात त्याचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आले तर तो किंवा त्याचा नॉमिनी विम्यासाठी दावा दाखल करू शकतो. अपंगत्वाला त्याला 50 हजार रुपयांचे संरक्षण मिळते. दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास, 01 लाख रुपयांचा विमा मिळतो. मृत्यू झाला तर कार्डच्या श्रेणीनुसार एक ते पाच लाख रुपयांची रक्कम मिळते.
9 / 10
अपघाताचा दावा करण्यासाठी कार्डधारकाच्या नॉमिनीला संबंधीत बँकेकडे अर्ज करावा लागतो. बँकेत अपघाताची एफआयआर प्रत, हॉस्पिटल उपचाराचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.
10 / 10
मृत्यू झाल्यास कार्डधारकाच्या नॉमिनीने मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत आदी गोष्टी सादर कराव्या लागतात. यानंतर विम्याची रक्कम दिली जाते. महत्वाचे म्हणजे याची माहिती तुमच्यापर्यंत ठेवू नका, नातेवाईक, जवळचे मित्र, कुटुंबातील व्यक्तींना द्या, जेणेकरून कोणी अडचणीत सापडला तर त्याला ही विम्याची मदत मिळेल.
टॅग्स :atmएटीएमbankबँकAccidentअपघात