शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ATM Cash Withdrawal Charges : एटीएममधून पैसे काढणं होणार महाग, नववर्षापासून होणार बदल, पाहा डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2021 9:28 AM

1 / 7
ATM Cash Withdrawal Charges : पुढील महिन्यापासून एटीएममधून कॅश काढणं महाग होणार आहे. १ जानेवारी २०२२ पासून फ्री ट्रान्झॅक्शनचं लिमिट पार केल्यानंतर पैसे काढल्यास ग्राहकांना अधिक शुल्क द्यावं लागेल.
2 / 7
जून महिन्यातच भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकांना १ जानेवारी २०२२ पासून मासिक मर्यादेपेक्षा अधिक रक्कम किंवा एटीएममधून अन्य ट्रान्झॅक्शन केल्यास त्यावर लागणारं शुल्क वाढवण्याची परवानगी दिली होती.
3 / 7
RBI च्या मार्गदर्शक सूचनांनुसार अॅक्सिस बँक किंवा अन्य बँकांच्या एटीएममझून १ जानेवारीपासू मोफत मर्यादेच्यावर आर्थिक देवाण-घेवाण झाल्या २१ रूपये अधिक जीएसटी असं शुल्क आकारलं जाणार असल्याची माहिती अॅक्सिस बँकेकडून देण्यात आली.
4 / 7
जानेवारी २०२२ पासून ग्राहकांना मोफत मर्यादेनंतर एटीएममधून ट्रान्झॅक्शन करायचं असल्यास त्यांच्याकडून प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी २० रूपयांऐवजी २१ रूपये शुल्क आकारलं जाईल.
5 / 7
वाढलेलं इंटरचेंज शुल्क आणि किंमतीत झालेली वाढ पाहता मोफत मर्यादेनंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी ग्राहक शुल्क २१ रूपये करण्यास परनावगी देण्यात आली आहे. ही दरवाढ १ जानेवारी २०२२ पासून लागू केली जाणार असल्याचं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं.
6 / 7
ग्राहकांना आपलं खातं असलेल्या बँकेच्या एटीएममधून दर महिन्याला पाच ट्रान्झॅक्शन (आर्थिक किंवा अन्य) करता येतील. मेट्रो सिटीमध्ये अन्य एटीएममधून तीन आणि नॉन मेट्रो सिटीमध्ये पाच वेळा मोफत ट्रान्झॅक्शन करू शकतात.
7 / 7
याशिवाय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक देवाण-घेवाणीसाठी इंटरचेज शुल्क १५ रुपयांवरून वाढवून १७ रुपये आणि सर्व केंद्रांवर विना-आर्थिक ट्रान्झॅक्शनसाठी ६ रूपयांवरून ७ रुपये करण्याची परवानगी दिली होती. १ ऑगस्ट २०२१ पासून याची अंमलबजावणी झाली.
टॅग्स :atmएटीएमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकMONEYपैसा