शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

UPI अ‍ॅपद्वारे एटीएममधून काढा पैसे! जाणून घ्या, सोपी प्रोसेस

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 7:47 PM

1 / 7
नवी दिल्ली : बदलत्या काळानुसार कॅश ट्रान्सफरच्या (Cash Transaction) पद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. आजकाल लोक बँकेच्या लांब रांगेत उभे राहण्याऐवजी ऑनलाइन पैसे ट्रान्सफर (Online Money Transfer) करणे पसंत करतात.
2 / 7
लोक नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड (Credit Card), डेबिट कार्ड, यूपीआय (UPI) द्वारे दोन मिनिटांत एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे ट्रान्सफर करू शकतात. रोख रकमेची गरज भासल्यास विविध ठिकाणी लावलेल्या एटीएम मशीनमधून लोक पैसे काढू शकतात.
3 / 7
दरम्यान, देशातील अनेक बँका एटीएम कार्ड नसतानाही पैसे काढण्याची सुविधा देतात. यासोबतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना यूपीआयद्वारे रोख पैसे काढण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.
4 / 7
आता बँकांच्या एटीएम मशीनमध्ये ही सुविधा सुरू करण्यासाठी यूपीआय ऑप्शन अपडेट केला जात आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला यूपीआयद्वारे पैसे काढण्याच्या सुविधेबद्दल सांगत आहोत.
5 / 7
एटीएम मशीनमध्ये यूपीआय ऑप्शन अपडेट होताच, तुम्ही एटीएम मशीनद्वारे रोख पैसे काढण्याची सुविधा सहजपणे घेऊ शकाल. यासाठी तुम्ही गुगल पे, पेटीएम, फोनपे इत्यादी अनेक प्रकारचे यूपीआय अॅप्स वापरू शकता. एटीएममधून पैसे काढण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पण डेबिट कार्ड घरीच विसरलेल्या लोकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
6 / 7
1) यासाठी सर्वात आधी एटीएम मशीनमधून Cash Withdrawal ऑप्शन निवडा. 2) यानंतर तुम्ही Cash Withdrawal with UPI हा ऑप्शन निवडा. 3) यानंतर तुम्हाला एटीएम मशीनमध्ये एक क्यूआर (QR) कोड दिसेल, जो तुमच्या यूपीआय अॅपद्वारे स्कॅन करावा लागेल.
7 / 7
4) स्कॅन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला काढायची असलेली रक्कम भरा. 5) यानंतर स्मार्टफोनमध्ये तुमचा यूपीआय पिन टाका. 6) यानंतर तुमचे Cash Withdrawal सोपे होईल. 7) या प्रोसेसद्वारे तुम्ही 5 हजार रुपये काढू शकता.
टॅग्स :atmएटीएमMONEYपैसाbusinessव्यवसाय