शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ATM ट्रान्झॅक्शन फेल झालं तर बँक वसूल करते पैसे; जाणून घ्या, किती भरावा लागतो दंड?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:58 PM

1 / 12
बँक खातं आणि एटीएममधून पैसे काढणं आता सामान्य बाब आहे. देशातील अनेक लोकांचं कोणत्याना कोणत्या तरी बँकेत अकाऊंट आहे. बँक आपल्या ग्राहकांना नवनवीन सुविधा देत असते. तसेच अनेक गोष्टींची सातत्याने माहिती देऊन सतर्क देखील करते.
2 / 12
बँक आपल्या ग्राहकांना काही सेवा या मोफत देत असते, पण अनेक प्रकारच्या सेवांसाठी बँक आपल्याकडून शुल्कही आकारते. बर्‍याचदा एटीएम ट्रान्झॅक्शन (ATM Banking) करताना खात्यात काही रक्कम शिल्लक (Insufficient balance) ठेवणं गरजेचं असतं मात्र ते विसरतो.
3 / 12
जर तुमच्या खात्यात 3000 रुपये शिल्लक आहेत आणि एटीएममधून पैसे काढण्याची रक्कम 3500 रुपये ठेवली तर अशा परिस्थितीत ते ट्रान्झॅक्शन फेल होतं. पण याचा ग्राहकांना मोठा तोटा आहे.
4 / 12
जर पुरेशी रक्कम अकाऊंटमध्ये शिल्लक नसेल तर बँक एटीएमद्वारे व्यवहार केल्यास आणि व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक आपणास शुल्क आकारते. हे शुल्क प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 20-25 रुपये असू शकतं.
5 / 12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआय ग्राहकांचं ट्रान्झॅक्शन (ATM Failed transaction) फेल झाल्यास बँक ग्राहकांकडून 20 रुपये दंड आकारते. यावर स्वतंत्र जीएसटी लागू केला होतो.
6 / 12
एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक आणि आयसीआयसीआय बँक कमी अकाऊंट बॅलेन्समुळे ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास दंड वसूल करतात.
7 / 12
ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना 25 रुपये द्यावे लागतात. जगातील इतर बँकांच्या एटीएममध्ये किंवा भारताबाहेरील कोणत्याही व्यापारी दुकानात कमी बॅलेन्स असेल तर 25 रुपये दंड आकारला जातो.
8 / 12
ट्रान्झॅक्शन फेल झाल्याबद्दल कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) 25 रुपये घेते.
9 / 12
अकाऊंटमध्ये कमी रक्कम असल्यास आणि ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास येस बँक दरमहा 25 रुपये घेते.
10 / 12
ट्रान्झॅक्शन फेल झाल्याबद्दल अ‍ॅक्सिस महिंद्रा बँक (Axis Bank) 25 रुपये घेते.
11 / 12
खात्यात किती पैसे आहेत हे आपल्याला आठवत नसेल तर एटीएममध्ये जाण्यापूर्वी आपण बॅलेन्स चेक केला पाहिजे. बहुतेक बँका एसएमएस आणि कॉलद्वारे खाते शिल्लक तपासण्याची सुविधा देतात.
12 / 12
आपण बँकेच्या सुविधा वापरू शकता. खात्यातील शिल्लक तपासण्यासाठी तुम्ही संबंधित बँकेचे यूपीआय अ‍ॅप किंवा बँकिंग अ‍ॅप देखील वापरू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :bankबँकMONEYपैसाState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडिया