शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एसआयबीनं घटवली एटीएममधून रोकड काढण्याची मर्यादा; जाणून घ्या इतर बँकांचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 8:29 PM

1 / 6
एसआयबीनं घटवली एटीएममधून रोकड काढण्याची मर्यादा; जाणून घ्या इतर बँकांचे नियम स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या एटीएममधून काढण्यात येणाऱ्या रोख रकमेच्या दैनंदिन मर्यादेमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या 31 ऑक्टोबरपासून एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून दररोज केवळ 20 हजार रुपयेच काढता येणार आहेत. सध्या एसबीआयच्या ग्राहकांना आपल्या एटीएममधून दररोज 40 हजार रुपये काढता येतात.
2 / 6
पंजाब नॅशनल बँकेच्या प्लॅटिनम कार्डधारकांना दिवसाकाठी 50 हजार रुपये काढता येतील. हे ग्राहक एकाचवेळी 15 हजार रुपये काढू शकतात. तर क्लासिक कार्डधारकांना एका दिवसाला 25 हजार रुपये काढतात येतात. हे ग्राहकदेखील एकाचवेळी 15 हजार रुपये एटीएममधून काढू शकतात.
3 / 6
देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक एका दिवसात एटीएममधून 50 हजार रुपये काढू शकतात.
4 / 6
अॅक्सिस बँकेचं बरगंडी कार्ड असलेल्या दिवसाला 3 लाख रुपये काढता येऊ शकतात. तर वेल्थ डेबिट कार्डधारक 2 लाख, प्रायॉरिटी डेबिट कार्डधारक 1 लाख, ऑनलाइन रिवार्ड्स डेबिट कार्डधारक 50 हजार, टाइटेनियम रिवार्ड्स डेबिट कार्डधारक 50 हजार आणि रिवार्ड्स+डेबिट कार्डधारक 50 हजार रुपये काढू शकतात.
5 / 6
एचडीएफसीकडून ग्राहकांना अनेक प्रकारची कार्ड्स दिली जातात. या कार्डच्या माध्यमातून दिवसाकाठी 75 हजार ते 1 लाख रुपये काढता येतात.
6 / 6
बँक ऑफ बडोदाचे खातेधारक एटीएमच्या माध्यमातून दर दिवसाला 25 हजार रुपये काढू शकतात.
टॅग्स :atmएटीएमICICI Bankआयसीआयसीआय बँकPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकSBIएसबीआय