शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान! ATM स्किमिंगनं रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट, जाणून घ्या कसं सुरक्षित ठेवाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 10:36 AM

1 / 8
सध्या डिजिटल पेमेंटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. डिजिटल पेमेंटमुळे व्यवहार सोपे झाले असले तरी यातून होणारे गुन्हे देखील वाढले आहेत. आता ATM स्किमिंगच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.
2 / 8
डिजिटल पेमेंटमुळे बँक व्यवहार जितके सोपे झाले तितकेच या व्यवहारात होणारे गुन्हे आणि सायबर गुन्ह्यांचीही वाढ झाली आहे. सायबर गुन्हेगार आता वेगवेगळ्या मार्गांनी फसवणुकीचा डाव आखत आहेत.
3 / 8
सायबर गुन्हेगारीतील असाच एक प्रकार म्हणजे ATM स्किमिंग. याचा वापर करुन सायबर गुन्हेगार तुमचं बँक खातं एका क्षणात रिकामी करू शकतात. त्यामुळे बँक खातेधारकांनी काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. साध्यासोप्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही एका मोठ्या फसवणुकीला बळी पडण्यापासून स्वत:ला वाचवू शकता.
4 / 8
स्मिमिंगसाठी ATM मध्ये लावण्यात आलेल्या मॅग्नेटिक चिपचा वापर केला जातो. सायबर गुन्हेगार कार्डच्या मागच्या बाजूवर असलेल्या मॅग्नेटीक स्ट्रिपवरील माहिती काढून घेतात आणि डेबिट, क्रेडिट तसंच ATM कार्डचे सर्व डिटेल्स चोरतात. सर्व डिटेल्स मिळाल्यानंतर बँक अकाऊंटवर डल्ला मारणं सोपं होतं.
5 / 8
सायबर गुन्हेगार यासाठी ATM च्या मशीनवर कार्ड रिडर स्लॉटच्या ठिकाणी डिव्हाइस लावण्यात येतं. स्किमरच्या माध्यमातून डिटेल्स स्कॅन केले जातात आणि त्यानंतर तुमच्या ATM ची सर्व माहिती स्टोअर केली जाते.
6 / 8
स्किमिंग एटीएम, रेस्टॉरंट, दुकानं इत्यादी ठिकाणी देखील केली जाऊ शकते. तुमचा पिन जाणून घेण्यासाठी एका छोट्या कॅमेराचा उपयोग केला जातो. एटीएम स्किमिंग करण्यासाठी चोरटे एखादं निर्जन स्थळी लावण्यात आलेलं एटीएम निवडतात आणि त्यात डिव्हाइस लावतात. लोकांच्या कार्डचा तपशील मिळाल्यावर ते त्यातून एटीएम कार्ड क्लोन करून पैसे चोरतात.
7 / 8
एटीएम वापरताना पिन संरक्षित करा. एटीएम वापरताना, कीपॅड एटीएम मशीनला जोडलेले दिसत नसल्यास व्यवहार करणे टाळावे. एटीएम वापरताना अनोळखी व्यक्तीची मदत घेणे टाळा. तुमच्या खात्यातील शिल्लक वेळोवेळी तपासत राहा.
8 / 8
तुमचा पिन कुठेही लिहू नका आणि रांगेत असलेल्या इतर कोणालाही त्याची माहिती देऊ नका. ATM कार्ड मशीनच्या स्लॉटमध्ये टाकत असताना काही संशयास्पद डिव्हाइस तर लावण्यात आलेलं नाही ना याची पडताळणी करुन घ्या. त्यानंतरच व्यवहार करावेत.
टॅग्स :atmएटीएमBanking Sectorबँकिंग क्षेत्र