Avail tax savings by investing in these 7 schemes Find out how much the interest rate will be
'या' ७ योजनांमध्ये गुंतवणूक करून कर बचतीचा लाभ मिळवा; जाणून घ्या व्याजदर किती मिळणार By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 4:02 PM1 / 7टॅक्स वाचवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. सरकारनेही काही योजनेवरती टॅक्स बचतीच्या योजना आणल्या आहेत. 2 / 7कर बचतीसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला आयकर कलम 80C आणि 80CCD(1B) अंतर्गत ५०,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. ही एक सेवानिवृत्ती योजना आहे, यामध्ये तुम्हाला कर सवलतीसह पेन्शनचा लाभ मिळतो.3 / 7सुकन्या समृद्धी योजना ही एक चांगली कर बचत योजना आहे. सरकार जानेवारी ते मार्च या तिमाहीत या योजनेअंतर्गत ठेवींवर ८.२० टक्के व्याजदर देत आहे. यासह, तुम्ही एका आर्थिक वर्षात SSY मध्ये २५० ते १.५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. आयकर कलम 80C अंतर्गत गुंतवलेल्या रकमेवर १.५० लाख रुपयांची सूट उपलब्ध आहे.4 / 7नॅशनल सेव्हिंग स्कीम ही एक उत्तम कर बचत योजना आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला जमा केलेल्या रकमेवर ७.७० टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही १००० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत कोणतीही रक्कम गुंतवू शकता. या योजनेत कलम 80C अंतर्गत १.५० लाख रुपयांची सूटही उपलब्ध आहे.5 / 7टॅक्स सेव्हिंग एफडी हा कर सवलतीसाठी गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही बँक किंवा पोस्ट ऑफिस एफडीमध्ये ५ वर्षांसाठी गुंतवणूक करून कर सवलतीचा लाभ मिळवू शकता. या योजनेअंतर्गत तुम्हाला ७.७० टक्के व्याजदर तसेच कलम 80C अंतर्गत १.५० लाख रुपयांची वार्षिक सूट मिळत आहे.6 / 7म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम ही देखील एक उत्तम कर बचत योजना आहे. या योजनेअंतर्गत, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत चांगल्या रिटर्न्स तसेच आर्थिक वर्षात १.५० लाख रुपयांची सूट मिळते.7 / 7कर बचतीसाठी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत १००० ते ३० लाख रुपयांपर्यंतची रक्कम गुंतवली जाऊ शकते, यावर सरकार सध्या ८.२० टक्के व्याज देत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications