शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

टर्म इन्शुरन्स घेताना या चुका टाळा, मग तुमचा फायदाच फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 9:14 AM

1 / 5
सुरक्षा (कव्हर) रक्कम ठरविण्यासाठी २० गुणिले तुमचे वार्षिक उत्पन्न हा थंब रुल फॉर्म्युला वापरला जातो. त्यात अनेक गोष्टींची सरासरी गृहित धरलेली असते. त्यामुळे तुमच्या गरजांसाठी तो उपयुक्त असेलच असे नाही. गरजा लक्षात घेऊन सुरक्षा रक्कम ठरवून घ्या.
2 / 5
कोट्यवधीची लॉटरी लागल्यानंतर चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक केल्यामुळे दिवाळखोर झालेल्या लोकांच्या कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. तुमच्या माघारी तुमच्या कुटुंबाच्या हातातही अशीच मोठी रक्कम पडणार असते. तिचा योग्य विनियोग व्हावा, यासाठी योग्य 'पे आऊट पर्याय तुम्ही निवडायला हवा. एकरकमी, मासिक उत्पन्न अथवा एकरकमी मासिक उत्पन्न असे पर्याय यात उपलब्ध असतात.
3 / 5
टर्म पॉलिसीसोबत काही रायडर्स अथवा अॅड-ऑन्स असतात. अनेकजण ते नाकारतात. तथापि, ते रायडर्स तुम्हाला संकटकाळी उपयोगी ठरू शकतात. उदा. आजारविषयक रायडर तुम्ही स्वीकारला असेल, तर गंभीर आजाराच्या वेळी तो तुमच्या आर्थिक गरजा भागवू शकतो. त्यामुळे रायडर्स नकारणे टाळले पाहिजे.
4 / 5
साधारणतः कंपन्यांच्या वेबसाईटवरील क्लेम सेटलमेंट रेशो बघून लोक टर्म पॉलिसी घेतात; पण हा आकडा फसवा असू शकतो. कंपनीच्या एकूण सेटलमेंटचा हा आकडा असतो. त्यात टर्म इन्शुरन्सचा आकडा अगदीच नगण्य असू शकतो. किंवा, छोट्या रकमांचे दावेच कंपनीने निकाली काढलेले असू शकतात. मोठे दावे नाकारलेले असू शकतात. त्यामुळे क्लेम सेटलमेंट रेशो चांगला असूनही तुमच्या कुटुंबाच्या हाती निराशा येऊ शकते.
5 / 5
टर्म इन्शुरन्सच्या अर्जात चुकीची माहिती भरली गेली असेल, तर तुमच्या माघारी कुटुंबाच्या पदरी निराशा येऊ शकते. त्यामुळे विमा एजंट अथवा सल्लागाराकडून अर्ज भरून घेणे टाळले पाहिजे.
टॅग्स :Investmentगुंतवणूक