शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फ्री लिमिटनंतर कॅश काढण्यासाठी दुप्पट शुल्क, खात्यातील किमान रक्कमही वाढली; 'या' बँकेचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 6:47 PM

1 / 15
तुमचं सॅलरी अकाऊंट किंवा सेव्हिंग अकाऊंट खाजगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेत आहे? जर असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
2 / 15
अ‍ॅक्सिस बँकेने बचत खात्यात १ मेपासून किमान शिल्लक ठेवण्याचे नियम बदलले आहेत.
3 / 15
त्याचबरोबर १ मेपासून एटीएममधून रोख रक्कम काढून घेतल्यानंतर सध्याच्या काळाच्या तुलनेत तुम्हाला दुप्पट शुल्क भरावे लागेल.
4 / 15
या व्यतिरिक्त बँकेने यापूर्वीच इतर सेवांसाठी शुल्क वाढवलं आहे. २७ एप्रिल रोजी बँकेनं तिमाहीचे निकाल सादर केले. मार्च तिमाहीत बँकेला २६७७ कोटी रूपयांचा नफा झाला आहे.
5 / 15
अ‍ॅक्सिस बँकेने १ मे २०२१ पासून किमान सरासरी शिल्लक रक्कम ठेवण्याची मर्यादा वाढविली आहे.
6 / 15
मेट्रो शहरांमध्ये अ‍ॅक्सिस बँकेच्या ईझी सेव्हिंग स्किम्स असलेल्या खात्यासाठी किमान शिल्लक रक्कम १० हजार रुपयांवरून १५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे सर्व देशांतर्गत आणि एनआरआय ग्राहकांना लागू असेल.
7 / 15
त्याचबरोबर, सेमी अर्बन आणि ग्रामीण भागातील प्राइम आणि लिबर्टी बचत खात्याची किमान शिल्लक आवश्यकता १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यात आली आहे.
8 / 15
अ‍ॅक्सिस बँकेतून पैसे काढणेही आता अधिक महाग होईल. अ‍ॅक्सिस बँक दरमहा ४ एटीएम व्यवहार किंवा २ लाख रुपयांचे व्यवहार विनामूल्य करण्याची मुभा देते.
9 / 15
यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. परंतु आता ग्राहकांना व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
10 / 15
आतापर्यंत मोफत मर्यादेनंतर १००० रूपयांवर ५ रूपये शुल्क आकारलं जायचं. परंतु १ मे नंतर ग्राहकांना मोफत मर्यादेनंतर १००० रुपयांच्या कॅश विड्रॉलवर १० रूपये द्यावे लागतील.
11 / 15
बँकेनं आपल्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार आता बँक २५ पैसे प्रति SMS च्या दरानं शुल्क आकारणार आहे.
12 / 15
सध्या बँक यासाठी ५ रुपये शुल्क आकारते. एसएमएस अॅलर्टसाठी शुल्क जास्तीजास्त २५ रूपये इतकं असेल.
13 / 15
यामध्ये बँकेकडून पाठवण्यास येणारे एसएमएस आणि ओटीपी यांचा समावेश नसेल. हे नवे दर १ जुलै पासून लागू होतील. प्रिमिअम, सॅलरी आणि बेसिक अकाऊंटसाठी हे शुल्क निराळं असेल.
14 / 15
बँकेनं सॅलरी अकाऊंटच्या नियमातही बदल केले आहेत. जर तुमचं खातं सहा महिने जुनं असेल आणि त्यात कोणत्याही एका महिन्यात सॅलरी क्रेडिट झाली नसेल तर तुमच्याकडून शुल्क आकारण्यात येईल.
15 / 15
याशिवाय तुमच्या खात्यातून १७ महिने कोणताही व्यवहार झाला नाही तर अठराव्या महिन्यात १०० रूपये शुल्क आकारलं जाईल.
टॅग्स :bankबँकMONEYपैसाIndiaभारतatmएटीएम