ayotechworld aviation sbi will give loan to buy agriculture drone
आता ड्रोनने होणार शेती; SBI देणार शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी स्वस्तात कर्ज By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 6:14 PM1 / 7ड्रोन निर्माता कंपनी अयोटेकवर्ल्ड एव्हिगेशनने आज स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सोबत भागीदारीची घोषणा केली. यादरम्यान एव्हिगेशनने सांगितले की, ही सरकारी बँक कंपनीचे कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात कर्ज देईल. 2 / 7तसेच, एसबीआय आयोटेकवर्ल्ड एव्हिगेशनच्या ग्राहकांना कोणतीही तारण न ठेवता बाजार दराने कर्ज देईल, असे कंपनीचे सह-संस्थापक दीपक भारद्वाज म्हणाले. दरम्यान, हा करार 1 फेब्रुवारी रोजी झाला होता, ज्यावर स्टेट बँक ऑफ इंडियामधील डीजीएम, आयसी अँड जीएल, एबीयू अँड जीएएचे योगेंद्र शेळके आणि दीपक भारद्वाज यांनी स्वाक्षरी केली होती. 3 / 7दीपक भारद्वाज म्हणाले की, कृषी-ड्रोन्स भारताच्या कृषी क्षेत्रासाठी वरदान ठरणार आहेत. एसबीआयने दिलेली कर्ज सुविधा त्या शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल, जे संस्थात्मक आर्थिक सुविधेअभावी ड्रोन खरेदी करू शकले नाहीत.4 / 7आयोटेकवर्ल्ड एव्हिगेशनच्या 'एग्रीबोट ड्रोन' ला भारतातील पहिले डीजीसीए 'टाईप सर्टिफिकेशन' प्राप्त झाले आहे. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जून २०२२ मध्ये आयोटेकवर्ल्ड एव्हिगेशनला हे प्रमाणपत्र दिले.5 / 7दुसरीकडे, या भागीदारीबद्दल आनंद व्यक्त करताना, आयोटेकवर्ल्ड नेव्हिगेशनचे सह-संस्थापक अनुप उपाध्याय म्हणाले की, ड्रोन शेतीमध्ये खते आणि कीटकनाशकांचा सर्वोत्तम वापर करण्यास मदत करतात, ज्यामुळे शेतीचा खर्च कमी होतो. शेती-ड्रोनचा वापर केल्यास उत्पादन तर वाढेलच, याशिवाय वेळेचीही मोठी बचत होईल. 6 / 7अॅग्री-ड्रोन्स भारतीय शेतीसाठी एक चमत्कार ठरणार आहेत.याचबरोबर, अनुप उपाध्याय म्हणाले की, कृषी पायाभूत सुविधा निधी (एआयएफ) भारत सरकारद्वारे कापणीनंतर उत्पादन व्यवस्थापन पायाभूत सुविधा आणि शेती मालमत्तेसाठी देण्यात येणारी एक आर्थिक सुविधा आहे. 7 / 72020 मध्ये सुरू करण्यात आलेल्या एआयएफ योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत आणि 2032-33 पर्यंत व्याज सवलत आणि कर्ज हमी सहाय्य द्यायचे आहे. एआयएफ अंतर्गत आतापर्यंत 15000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications