शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ayushman Card:आयुष्यमान कार्डचे नियम बदलले, कार्ड सहज बनणार, फक्त 'ही' कागदपत्रे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 2:00 PM

1 / 8
सध्या रुग्णालयाचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, यामुळे सर्वसामान्यांना उपचाराचा परवडत नाही.यामुळे केंद्र सरकारने आयुष्यमान भारत ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत तुम्हाला ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतात. या योजनेतील नियमात बदल केले आहेत, आता ७० वर्षावरील वयस्कर लोकांनाही याचा लाभ मिळणार आहे.
2 / 8
आयुष्यमान भारत ही योजना २०१८ मध्ये सुरू झाली. गरीब आणि गरजूंना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारने नंतर या योजनेला जन आरोग्य योजना असे नाव दिले.
3 / 8
या योजनेचा लाभार्थी आणि त्याच्या कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळतो. या विम्याच्या माध्यमातून तो सरकारी आणि खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकतो. या योजनेत लाभार्थ्याला आयुष्मान कार्ड मिळते. हे कार्ड रुग्णालयात दाखवून लाभार्थी आपले उपचार करून घेऊ शकतात.
4 / 8
तुम्हीही या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकता.
5 / 8
तुम्हाला जन आरोग्य योजनेच्या अधिकृत वेबसाइटला (https://beneficiary.nha.gov.in/) भेट देऊन लॉग इन करावे लागेल. आता तुम्हाला काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल आणि सबमिट पर्याय निवडा.
6 / 8
यानंतर, तुमची आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती स्क्रीनवर दिसेल. आता Apply हा पर्याय निवडा, त्यानंतर एक नवीन पेज उघडेल यामध्ये अर्ज असेल.
7 / 8
अर्ज भरल्यानंतर, तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला ओटीपी व्हॅलिडेशन करावे लागेल. OTP प्रमाणीकरणानंतर, तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.
8 / 8
योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कुटुंबातील सर्व सदस्यांचे ओळखपत्र द्यावे लागतील. याशिवाय तुम्हाला ॲड्रेस प्रूफ माहितीही द्यावी लागेल. आयडी प्रूफमध्ये तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर कार्ड इत्यादी देऊ शकता.
टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतNarendra Modiनरेंद्र मोदी