b ravi pillai the first indian to buy rs 100 crore airbus helicopter know net worth
बी. रवी पिल्लई : शेतकरी कुटुंबात जन्म, १०० कोटींचे हेलिकॉप्टर अन् ७० हजार कर्मचारी असलेल्या कंपनीचे मालक! By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 11:04 AM1 / 10एका भारतीय व्यक्तीने १०० कोटी रुपयांना एअरबस एच १४५ हेलिकॉप्टर (Airbus H145 Helicopter) खरेदी केल्यामुळे एकच चर्चा झाली होती. हे हेलिकॉप्टर घेणारे ते पहिले भारतीय होते. 2 / 10दरम्यान, आरपी ग्रुप ऑफ कंपनीजचे (RP Group) अध्यक्ष बी. रवी पिल्लई यांनी जून २०२२ मध्ये हे हेलिकॉप्टर खरेदी केले होते. ते एका शेतकऱ्याचे पुत्र आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी १ लाख रुपयांचे कर्ज घेऊन चिटफंड कंपनी सुरू केली आणि नंतर मोठे यश मिळवले.3 / 10आरपी ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष बी. रवी पिल्लई यांच्या कंपनीत सध्या ७० हजारांहून अधिक लोक काम करतात. त्यांचा जन्म २ सप्टेंबर १९५३ रोजी केरळमधील कोल्लम जिल्ह्यात झाला आणि त्यांचे वडील शेतकरी होते. 4 / 10खूप मेहनत करून त्यांनी एक मोठी कंपनी उभी केली. पिल्लई यांनी स्थानिक महाविद्यालयातून पदवी आणि नंतर कोची विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात (बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) पदव्युत्तर शिक्षण घेतले.5 / 10शिक्षण घेत असतानाच बी. रवी पिल्लई यांना व्यवसाय करण्याची कल्पना सुचली आणि त्यांनी स्थानिक सावकाराकडून १ लाख रुपयांचे कर्ज घेऊन स्वतःची चिटफंड कंपनी सुरू केली. या व्यवसायातून पैसे कमवून त्यांनी कर्जाची परतफेड केली आणि उरलेले नफ्याचे पैसे साठवून ठेवले. 6 / 10नफ्याचे पैसे वापरून बी. रवी पिल्लई यांनी स्वतःची बांधकाम कंपनी स्थापन केली. कंपनीला पहिले कंत्राट वेल्लोर हिंदुस्थान न्यूजप्रिंट फॅक्टरीमधून मिळाले, परंतु कामगारांच्या समस्येमुळे कंपनी बंद करावी लागली.7 / 10जेव्हा कंपनी बंद झाली तेव्हा बी. रवी पिल्लई सौदी अरेबियाला गेले आणि १९७८ मध्ये त्यांनी इस्लामिक देशात बांधकाम आणि व्यापार व्यवसाय सुरू केला. यानंतर त्यांनी सौदी अरेबियामध्ये नसीर एस अल हजरी नावाने १५० लोकांसह स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केली. 8 / 10बांधकाम कंपनीने त्यांच्यासाठी प्रचंड नफा कमावला आणि त्यांना भरपूर कमाई करून दिली. जगभरातून मोठ्या कंपन्यांकडून ऑफर मिळाल्या. यानंतर त्यांनी आपला व्यवसाय आलिशान हॉटेल्स, स्टील, गॅस, सिमेंट आणि शॉपिंग मॉल्सपर्यंत वाढवला.9 / 10नोव्हेंबर २०१५ मध्ये बी. रवी पिल्लई यांच्या मुलीच्या लग्न समारंभात ४२ देशांतून सुमारे ३० हजार पाहुणे आले होते. केरळमधील हा सर्वात महागडा विवाह होता. त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांच्या महागड्या कार आणि १०० कोटी रुपयांचे आयबस हेलिकॉप्टर आहे. 10 / 10बी. रवी पिल्लई यांची एकूण संपत्ती ३.२ अब्ज डॉलर्स इतकी आहे. जगातील टॉप १००० हजार श्रीमंतांमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांना २०१० मध्ये पद्मश्री आणि २००८ मध्ये प्रवासी भारतीय सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications