Baal Aadhaar Card: लहान मुलांचं आधार बनवायचंय की बायोमॅट्रिक डिटेल्स अपडेट करायच्यात; लागेल का कोणतं शुल्क? By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 9:15 AM
1 / 8 आधार जारी करणारं प्राधिकरण, यूआयडीएआय मुलांसाठीदेखील आधार जारी करते. याला बाल आधार असं म्हणतात. भारतातील लहान मुलंही आधार कार्ड घेण्यास पात्र आहेत. त्यामुळे अनेक रुग्णालयांनी आधारसाठी मुलांची नोंदणी सुरू केली असून ते आजकाल जन्म दाखल्यासह आधार नोंदणी स्लिपही देतात. आम्ही तुम्हाला बाल आधार कसं तयार करावं आणि अपडेट कसं करावं याबद्दल माहिती देणार आहोत. 2 / 8 सर्वप्रथम बाल आधार म्हणजे काय हे समजून घेऊया. खरं तर पाच वर्षांखालील मुलांच्या आधार कार्डला बाल आधार म्हणतात. बाल आधार हे निळ्या रंगाचं आधार कार्ड असतं, जे त्याला इतर आधार कार्डांपेक्षा वेगळे बनवतं. सध्या देशभरात बालकांचं आधार बनवण्यासाठी बाल आधार अभियान राबविलं जात आहे. या आधार कार्डच्या माध्यमातून मुलं आणि त्यांच्या पालकांना अनेक सुविधांचा लाभ दिला जातो. 3 / 8 मुलाची बायोमेट्रिक माहिती बाल आधारमध्ये समाविष्ट केली जात नाही. मुलांचं आधार कार्ड पालकांच्या आधार कार्डशीही जोडलेलं असतं. मात्र, मूल ५ वर्षांपेक्षा जास्त वयाचं झाल्यावर त्यांचं बायोमेट्रिक अपडेट प्रथमच घेतलं जातं. मुलाचं वय १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा बायोमेट्रिक अपडेट घेतले जातात. बायोमेट्रिक अपडेट घेण्यामागचे कारण म्हणजे काळाच्या ओघात मुलांच्या बोटाच्या ठशांमध्ये आणि रेटिनामध्ये होणारा बदल. 4 / 8 बाल आधार सामान्य आधारच्या दृष्टीनं वेगळा असतो. मुलाच्या आधार कार्डचा रंग निळा असतो. त्याचबरोबर मुलाच्या आधार कार्डवर 'त्याची वैधता वयाच्या ५ वर्षापर्यंत लिहिली जाते'. असं केलं जातं जेणेकरून मुलाचं वय पाच वर्षे पूर्ण होताच त्याच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक अपडेट जोडलं जातं. म्हणजे मुलांच्या बोटांचे ठसे आणि रेटिना कॅप्चर केली जाऊ शकतात. 5 / 8 मुलाच्या जन्मानंतर त्याच्या पालकांना आधार सेवा केंद्रात जाऊन मुलांचं आधार बनवून घ्यावं लागतं. तसंच बाळाचा जन्म दाखला किंवा जन्मानंतर आई व बाळाची डिस्चार्ज स्लिप शासकीय रुग्णालयात ठेवावी लागते. त्याचबरोबर मुलाच्या पालकांना दोघांच्याही किंवा एकाच्या आधार कार्डची प्रत जोडावी लागणार आहे. 6 / 8 सर्वप्रथम जवळच्या आधार सेवा केंद्रावर जा. तिथे तुम्हाला बाल आधार कार्डसाठी एक अॅप्लिकेशन मिळेल. तो अर्ज भरा आणि त्यासोबत पालकांचे आधार कार्ड आणि मुलाच्या जन्म दाखल्याची झेरॉक्स जोडा. अर्जात आधार कार्डची माहिती आणि पालकांचा मोबाइल क्रमांक प्रविष्ट करणं आवश्यक आहे. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तेथे मुलांचा फोटो घेण्यात येईल. यानंतर दिलेल्या मोबाइल नंबरवर आधार कार्डचा मेसेज येईल. 7 / 8 बाल आधारमध्ये बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी अपॉइंटमेंट बुक करावी लागते. यानंतर आवश्यक ती सर्व कागदपत्रे घेऊन आधार केंद्रावर जाण्याची गरज आहे. आधार केंद्रावर मुलाचा बायोमेट्रिक डेटा घेतला जाईल, त्यानंतर हा डेटा मुलाच्या आधार कार्डमध्ये अॅड केला जाईल. 8 / 8 मुलांसाठी वेळेवर बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. फिंगरप्रिंट, आयरिस आणि फोटो सारख्या बायोमेट्रिक्सचे अपडेट वयाच्या ५ ते ७ वर्षे वयापर्यंत एकदा केल्यास विनामूल्य आहे. वयाच्या १५ ते १७ वर्षादरम्यान एकदा अपडेट केल्यास हे विनामूल्य देखील आहे. याशिवाय अपडेट केल्यास १०० रुपये शुल्क आकारलं जातं. आणखी वाचा