पतंजलीचा दूध उत्पादन क्षेत्रात प्रवेश; सहा महिने टिकणारं दूध केलं लॉन्च By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 8:06 PM
1 / 5 योगगुरू बाबा रामदेव यांनी पंतजलीचं नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं आहे. ज्यामध्ये टेट्रा दूध सहा महिन्यापर्यंत खराब होणार नाही. दूध क्षेत्रात पंतजली आपलं पाऊल टाकत आहे. 2 / 5 बाबा रामदेव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पंतजली टोंड दूध आणि त्यापासून बनणारे पदार्थ लॉन्च करण्याची घोषणा केली. ग्राहकांच्या पसंतीत उतरुन गुणवत्ताधारक पदार्थ देण्याचा पंतजलीचा मानस आहे. 3 / 5 येणाऱ्या काळात पंतजली टोंड मिल्क बाजारपेठेत उतरविणार आहे. गायचं हे दूध पूर्णपणे नैसर्गिक असणार आहे. हे दूध अन्य ब्रॅन्डपेक्षा स्वस्त असेल. ज्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळेल. त्याचसोबत दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे योग्य दर दिले जातील. 4 / 5 पंतजली शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करुन बाजारात विकतं. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दूधाचे पैसे टाकले जातात. राजस्थान, महाराष्ट्र आणि मेरठमध्ये पंतजलीच्या दूध डेअरी आहेत. 15 हजार शेतकऱ्यांकडून प्रतिदिन 4 लाख लीटर दूध खरेदी केलं जातं. आगामी काळात 10 लाख लीटर दूध खरेदी करण्याची पंतजलीची योजना आहे. 5 / 5 दूधाचे वाढते दर लक्षात घेता पंतजली या क्षेत्रात पुढे आली आहे. पंतजलीच्या दूधाची किंमत 40 रुपये प्रतिलीटर असणार आहे. हे दूध सहा महिने टिकणार असून सुरक्षित राहणार आहे. आणखी वाचा