शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Baba Ramdev IPO : बाबा रामदेव देणार गुंतवणूकीची संधी, आणणार ‘या’ पाच कंपन्यांचे IPO

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 9:45 PM

1 / 6
योगगुरू रामदेव यांच्या किमान 5 कंपन्यांचे आयपीओ (IPO) येण्याच्या तयारीत आहेत. याद्वारे कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध होतील. खुद्द बाबा रामदेव यांनीच यासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे.
2 / 6
झी बिझनेसला दिलेल्या मुलाखतीत योगगुरू रामदेव यांनी सांगितले की ज्या कंपन्यांचा आयपीओ लाँच होणार आहे ,त्यामध्ये पतंजली आयुर्वेद, पतंजली वेलनेस आणि पतंजली मेडिसीन याशिवाय पतंजली लाइफस्टाइल यांचा समावेश आहे. या कंपन्या पुढील 5 वर्षात शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.
3 / 6
बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदने 2019 मध्ये रुची सोयाला एका ठराव प्रक्रियेचा भाग म्हणून 4,350 कोटी रुपयांना विकत घेतले होते. ही कंपनी आधीच स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट झाली होती. त्याच वर्षी कंपनीचे नाव बदलून पतंजली फूड्स करण्यात आले.
4 / 6
पतंजली फूड्सच्या शेअर्सची खरेदी सुरूच आहे. यामुळे शेअरचा भाव 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी, शेअरची किंमत 1380.35 रुपये होती. व्यवहारादरम्यान शेअरची किंमत 1400 रुपयांपर्यंत गेली होती. त्याच वेळी मार्केट कॅपने 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.
5 / 6
अलीकडेच, अँटिक स्टॉक ब्रोकिंगमधील विश्लेषक धीरज मिस्त्री, अभिजित कुंडू आणि प्रियांका त्रिवेदी यांनी पतंजली फूड्सवर एक अहवाल तयार केला. या अहवालात कंपनीच्या वाढीबाबत आत्मविश्वास दिसून आला. यासोबतच BUY रेटिंग म्हणजेच खरेदीचा सल्ला देण्यात आला होता.
6 / 6
विश्लेषकांनी सांगितले होते की शेअरची किंमत 1725 रुपयांपर्यंत जाऊ शकते. सध्याच्या दृष्टीनं पाहता गुंतवणूकदारांना 300 रुपयांपेक्षा अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे. (टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीshare marketशेअर बाजार