Banana chips making business can be more profitable than a job, can earn up to four thousand per day
नोकरीपेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकतो हा व्यवसाय, दररोज करू शकता चार हजारांपर्यंत कमाई By बाळकृष्ण परब | Published: February 12, 2021 9:04 AM1 / 9गेल्या काही काळात चाकोरीबद्ध नोकरी करण्यापेक्षा व्यवसायांमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या संकटात आल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांचे महत्त्व वाढले आहे. 2 / 9दरम्यान, जर तुम्हीही कुठला नवा व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला एका व्यवसायाबाबत माहिती देत आहोत. या व्यवसायामधून तुम्ही दररोज चार हजार रुपयांपर्यंतची घसघशीत कमाई करू शकता. 3 / 9हा व्यवसाय आहे केळ्याच्या चिप्स बनवण्याचा. केळ्याच्या चिप्स आरोग्यासाठी चांगल्या असतात. तसेच उपवासाच्या वेळीही त्यांचे सेवन केले जाते. केळ्याच्या चिप्सला बटाट्याच्या चिप्सपेक्षा अधिक मागणी असते. त्यामुळे त्याची विक्रीही अधिक होते. 4 / 9मात्र केळ्याच्या चिप्सचा बाजार मर्यादित असल्याने मोठ्या ब्रँडेड कंपन्या या व्यवसायात उतरत नाहीत. त्यामुळेच केळ्याच्या चिप्स बनवण्याच्या व्यवसायामध्ये चांगली संधी उपलब्ध आहे. आता आपण हा व्यवसाय कसा सुरू करू शकतो याविषयी जाणून घेऊयात. 5 / 9केळ्याच्या चिप्स बनवण्यासाठी विविध प्रकारची यंत्रसामुग्री वापरली जाते. तसेच कच्चा माल म्हणून, कच्ची केळी, मीठ, खाद्य तेल आणि मसाले यांचा वापर केला जातो. 6 / 9केळी धुण्यासाठीचा टँक आणि केळी सोलण्याचे यंत्र, केळ्यांचे तुकडे करणारी मशीन, केळ्यांचे तुकडे तळणारी मशीन, मसाले मिसळणारी मशीन, पाऊच प्रिंटिंग मशीन आणि प्रयोगशाळेतील उपकरणे.7 / 9केळ्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही ही यंत्रसामुग्री https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html या संकेतस्थळांवरून खरेदी करू शकता. या मशीन ठेवण्यासाठी तुम्हाला चार ते पाच हजार चौरस फूट जागा लागेल. ही यंत्रसामुग्री तुम्हाला २८ हजार ते ५० हजारांपर्यंत मिळून जाईल. 8 / 9५० किलो चिप्स बनवण्यासाठी तुम्हाला १२० किलो कच्ची केळी, १२ ते १५ लिटर तेल. मशीनसाठी ११ लिटर डिझेल. मीठ आणि मसाले असे मिळून एकूण ३२०० रुपयात ५० किलो चिप्स तयार होतील. याचा अर्थ एक किलो चिप्सची किंमत ही ७० रुपयांपर्यंत जाईल. या चिप्स तुम्ही ऑनलाइन किंवा किराणा स्टोअर्सवर ९० ते १०० रुपयांना विकू शकता. 9 / 9जर एक किलो चिप्सच्या पॅकेटवर १० रुपये नफ्याचा विचार केल्यास तुम्ही एका दिवसात चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम आरामात कमाऊ शकता. म्हणजेच महिनाभरात तुमच्या कंपनीने २५ दिवस जरी काम केले तरी तुम्ही महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. आणखी वाचा Subscribe to Notifications