Bank Holiday in May: How many days will the banks be closed in May? Start planning today ...
Bank Holiday in May: मे मध्ये बँका किती दिवस बंद असणार? कामांचे नियोजन आजपासूनच करा... By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 4:33 PM1 / 7आजकाल सर्व कामे ऑनलाईन होत आहेत. अगदी भाजीपाल्यापासून ते तयार जेवणही ऑनलाईन मागविता येत आहे, वस्तूंचे वेगळे सांगायला नको. या साऱ्यांचे पैसे देखील ऑनलाईन अदा करता येतात. तरीही बँकांमधील गर्दी काही कमी होत नाही. कोणाला पैसे भरायचे असतात, कोणाला काढायचे असतात, तर कोणाला खात्यांशी संबंधीत अन्य कामे असतात. यामुळे काही बँका त्यांच्या शाखा विकेंडला देखील सुरु ठेवतात. 2 / 7कारण अनेकजण नोकरी करतात, त्या वेळेतच बँकांचे कामकाज सुरु असल्याने अनेकांची अडचण होते. यामुळे सुट्ट्यांचे नियोजनही करावे लागते. अशातच आता शाळांनाही सुट्या सुरु झाल्या आहेत. यामुळे या सुट्यांच्या लोक आपापल्या गावी, परगावी जातात, त्यामुळे बँकेची कामे करायची असतील तर कमी वेळ आहे. या मे महिन्यात १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. 3 / 7१ मे रोजी कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि रविवार अशा सर्वच सुट्या एकाच दिवशी आल्या आहेत. तर दोन मे रोजी परशुराम जयंतीची सुटी काही राज्यांमध्ये असणार आहे. 4 / 7३ मे रोजी ईद उल फितरमुळे देशभरात सुटी राहणार आहे. तर बसव जयंतीमुळे कर्नाटकात सुटी राहणार आहे. तर चार मे रोजी ईद-उल-फितरची सुटी तेलंगानामध्ये दिली जाणार आहे. ८ मे रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील. 5 / 7९ मे रोजी गुरु रवींद्रनाथ जयंती आहे. यामुळे पश्चिम बंगाल व त्रिपुरामध्ये बँक बंद राहणार आहेत. १४ मे रोजी दुसरा शनिवार आणि १५ मे रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. 6 / 7१६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा आहे, ज्यामुळे देशभरात बँका बंद राहतील. २२ मे रोजी रविवारी सुट्टी राहील. दुसरीकडे २४ मे रोजी काझी नजरुल इस्लाम जयंतीअसल्याने सिक्किममध्ये बँका बंद राहणार आहेत. 7 / 7त्यानंतर २८ तारखेला चौथा शनिवार आणि २९ मे रोजी रविवार येत आहे. यामुळे या दोन दिवशी बँकांना सुटी असणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications