शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Bank Locker Charges: SBI पासून ICICI पर्यंत..., बँक लॉकर्ससाठी किती शुल्क आकारतात बँका?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 12:49 PM

1 / 6
नवी दिल्ली : तुम्ही बँक लॉकर घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या महत्त्वाची आहे. अनेकांना असे वाटते की, बँकेचे लॉकर घेणे हे खूप जास्त पैशाचे काम आहे. पण तसे नाही, खरंतर लॉकरचे शुल्क लॉकरच्या आकारावर अवलंबून असते.
2 / 6
बहुतेक लोक सुरक्षिततेसाठी दागिने, मौल्यवान वस्तू आणि आवश्यक कागदपत्रे इत्यादी बँक लॉकरमध्ये ठेवतात. या सेवेसाठी लॉकरच्या आकारानुसार बँकांकडून शुल्क आकारले जाते. काही बँका खात्यात जमा झालेल्या रकमेच्या आधारे ग्राहकांना लॉकर देखील देतात. विविध बँकांचे लॉकर आणि एरियानुसार त्यांचे शुल्क जाणून घेऊया...
3 / 6
आकार आणि शहरानुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लॉकर्स 500 ते 3,000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. लहान, मध्यम आकाराच्या आणि मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी, मेट्रो आणि शहरी भागात अनुक्रमे 2 हजार, 4 हजार, 8 हजार आणि 12 हजार शुल्क आकारले जाते. निम-शहरी आणि ग्रामीण भागात लहान, मध्यम, मोठ्या आणि अतिरिक्त मोठ्या आकाराच्या लॉकरसाठी बँक अनुक्रमे 1500 रुपये, रुपये 3000, रुपये 6000 आणि 9000 रुपये आकारते.
4 / 6
आयसीआयसीआय (ICICI) बँक लॉकरचे भाडे एक वर्ष अगोदर आकारते. ICICI मध्ये लॉकर उघडण्यासाठी तुमचे बँक खाते असणे आवश्यक आहे. बँकेतील लहान आकाराच्या लॉकरसाठी तुम्हाला 1,200 ते 5,000 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर, मोठ्या आकारासाठी 10 हजार ते 22 हजार रुपये शुल्क आकारले जाते. या शुल्कावर जीएसटी वेगळा आहे.
5 / 6
तुम्ही पंजाब नॅशनल बँकेमध्ये (PNB) लॉकर घेतल्यास, तुम्ही एका वर्षात 12 वेळा मोफत भेट देऊ शकता. अतिरिक्त भेटीसाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागतील. ग्रामीण भागात लॉकरचे वार्षिक भाडे 1250 ते 10,000 रुपयांपर्यंत आहे. शहरी आणि मेट्रो शहरांसाठी हे शुल्क 2 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत आहे.
6 / 6
अॅक्सिस बँकेत (Axis Bank) तुम्ही एका महिन्यात तीन मोफत भेटी देऊ शकता. मेट्रो किंवा शहरी क्षेत्र शाखेत लॉकरचे शुल्क 2,700 रुपयांपासून सुरू होते. मध्यम आकाराच्या लॉकरसाठी, हे शुल्क 6,000 रुपये आहे, तर मोठ्या आकाराचे लॉकर 10,800 ते 12,960 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
टॅग्स :businessव्यवसायbankबँकMONEYपैसाSBIएसबीआयPunjab National Bankपंजाब नॅशनल बँकICICI Bankआयसीआयसीआय बँक