bank of maharashtra indian overseas bank cut mclr up to 10 basis points
'या' दोन सरकारी बँकांच्या ग्राहकांसाठी भारी गिफ्ट, एकाच वेळी घेतला मोठा निर्णय By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 8:02 PM1 / 8कोरोना संकट काळात सरकारी बँकांबरोबरच खासगी बँकांनीही आपल्या ग्राहकांसाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. काही बँकांनी नव्या योजना सुरू केल्या आहेत. तर अनेक बँका कर्जावरील व्याजदर सातत्याने कमी करत आहेत.2 / 8याचाच भाग म्हणून, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने अपल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे.3 / 8या दोन्ही बँकांनी कर्जावरील व्याजदर पुन्हा कमी केला आहे. अर्थात आपण या बँकांचे ग्राहक असाल, तर आपल्याला स्वस्त दरात कर्ज मिळू शकणार आहे.4 / 8बँक ऑफ महाराष्ट्रनुसार, एक वर्ष अथवा सहा महिन्यांच्या कर्जावर मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट्स (MCLR) अनुक्रमे 7.30 टक्के आणि 7.25 टक्के असेल.5 / 8बँक ऑफ महाराष्ट्रने एक दिवस, एक महिना आणि तीन महिन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआरमध्ये सुधारणा करून प्रत्येकी 6.80 टक्के आणि 7 टक्के आणि 7.20 टक्के केला आहे. हा दर सोमवारपासून लागू झाला आहे.6 / 8याच प्रमाणे, इंडियन ओव्हरसीज बँकेने सर्व कालावधीतील कर्जांसाठी एमसीएलआर 0.10 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.7 / 8बँकेच्या एक वर्षासाठीच्या कर्जाचा एमसीएलआर 7.55 टक्के राहील. तर तीन माहिने आणि सहा महिन्यांच्या कर्जासाठी एमसीएलआर कमी करून अनुक्रमे 7.45 टक्के आणि 7.55 टक्के करण्यात आला आहे. 8 / 8या बँकेचे हे नवे दर 10 सप्टेंबरपासून लागू होतील. आणखी वाचा Subscribe to Notifications